निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांची ती पोस्ट होतेय सोशल मीडियावर व्हायरल

निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांची

ती पोस्ट होतेय सोशल मीडियावर व्हायरल

नाशिक: प्रतिनिधी

आगामी महापालिका तसेच जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राजकीय मंडळींच्या या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणे सुरू झाले आहे. त्यातही शिवसेनेची  फाटाफूट झाल्यानंतर उबाठा गटातून शिंदे गटात जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अनेकजण निष्ठाना तिलांजली देत आहेत. अशा परिस्थितीमध्ये निफाडचे माजी आमदार अनिल पाटील कदम यांची सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अशी आहे पोस्ट

शिवसेना – एक विचार, एक संस्कार, एक जीवनमार्ग

लहानपणापासून माझ्या अंतःकरणात खोलवर रुजलेलं नाव म्हणजे शिवसेना.
हा केवळ पक्ष नाही, ही आहे मराठी अस्मितेची चळवळ, हिंदुत्वाचा अभिमान,
आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा एक ज्वलंत अध्याय.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं तेजस्वी नेतृत्व, त्यांची प्रखर वक्तृत्वशैली,
त्यांनी घडवलेला कार्यकर्ता, आणि त्यांचा महाराष्ट्रभर ते काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत
आणि जगभरातील मराठी मनांवर उमटलेला प्रभाव — हे सगळं आजही जिवंत आहे.

५९ वर्षांचा प्रवास हा नुसता वेळ नाही,
तर तो आहे लाखो शिवसैनिकांच्या घामाचा, त्यागाचा, निष्ठेचा आणि अभिमानाचा दस्तऐवज.
आज शिवसेनेवर जे अघटित झाले, ते दुःखद आणि असह्य आहे.
ही फक्त फाटाफुटी नाही, तर एका वैभवशाली विचारधारेवर झालेला आघात आहे.
काय झालं, कुणी केलं, का केलं – हे प्रश्न आजही अनेक मनात खदखदत आहेत. पण मी एक सांगतो –
शिवसेना ही केवळ संघटना नव्हती, ती आमचं आयुष्य होती.
आणि बाळासाहेब हे केवळ नेते नव्हते, ते आमचे देव होते. आज मी जे काही आहे –ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद सदस्य, सभापती आणि दोन वेळा आमदार (MLA) – या सगळ्या पदांवर मी पोहोचलो,
ते केवळ आणि केवळ शिवसेनेमुळे, बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आणि उद्धवसाहेब ठाकरे व त्यांच्या कुटुंबियांच्या आशीर्वादामुळेच. आज माझं नाव अनिल कदम. जर कुठे “ब्रँड” म्हणून ओळखलं जात असेल, तर तो सारा मान मी बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियांना देतो. मी मनापासून नतमस्तक होतो उद्धवसाहेब ठाकरे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांपुढे.
निफाड तालुक्यातील प्रत्येक शिवसैनिक, मतदार आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं मी मनःपूर्वक आभार मानतो. आजही माझ्या मनात फक्त आणि फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आहे,
आणि तोच माझा श्वास आहे, माझं बळ आहे.जय हिंद, जय महाराष्ट्र
जय शिवसेना!

– आपला
अनिल कदम

 

Bhagwat Udavant

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

7 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

7 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

7 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

7 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

7 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

8 hours ago