नाशिक

मुंबई-नाशिक महामार्गावर अपघातात चौघांंचा मृत्यू

इगतपुरी : प्रतिनिधी
मुंबई-नाशिक महामार्गावर बुधवारी (दि.16) दुपारी दोन वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात झालेल्या मृतांमध्ये लहान मुलांचा आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील आटगावजवळ दोन वर्षांपूर्वी जळालेल्या उभ्या असलेल्या ट्रकला इर्टिगा कारने मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातातील सर्व जोगेश्वरी येथील राहणारे होते. देवदर्शनासाठी कुटुंबासह नाशिक व त्र्यंबकेश्वरला आले होते. देवदर्शन आटोपून पुन्हा जोगेश्वरीकडे (मुंबई) जात असताना परतीच्या प्रवासात आटगावजवळ हा भीषण अपघात झाला. अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून, यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. सहा जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वरचे दर्शन आटोपून हे कुटुंब मुंबईच्या दिशेने परतत होते. यादरम्यान मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील आटगावजवळ एका वाहनाचा चक्काचूर झाला असून, आतील प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या. या दुर्घटनेत चार जणांचा जागीच किंवा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. श्रीराम जैस्वाल, आयुष जैस्वाल, लाडो जैस्वाल, सूरज जैस्वाल यांचा मृत्यू झाला आहे. सुभी जैस्वाल, शिवम जैस्वाल, हाशिक जैस्वाल, सुनीता जैस्वाल, राधिका जैस्वाल, सतीश जैस्वाल हे सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमींवर शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Four killed in accident on Mumbai-Nashik Highway

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

4 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

4 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

4 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

4 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

4 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

4 hours ago