नाशिक

चार महिन्यांच्या चिमुकलीचा ना.रोडला उष्माघाताने मृत्यू

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथून लग्नसमारंभासाठी नाशिकमध्ये आलेल्या एका कुटुंबातील चार महिन्यांच्या चिमुरडीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
इंदापूर तालुक्यातील गोथंडी येथील शुभम काटेकर आणि प्रतीक्षा काटेकर हे दाम्पत्य आपल्या चार महिन्यांच्या मुलीसह बुधवारी नाशिकमध्ये आले होते. सामनगाव रोड परिसरातील एका लॉन्सवर त्यांच्या नातेवाइकांचा विवाह सोहळा होता. इंदापूरहून खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करताना प्रखर उन्हाचा फटका चिमुरडीला बसल्याची शक्यता व्यक्त केली जात
आहे.
प्रवासादरम्यान चिमुरडी खेळत होती. मात्र, उष्णतेमुळे ती काहीशी सुस्त झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. लग्नसमारंभाच्या गडबडीत पहाटे चार वाजेच्या सुमारास आई प्रतीक्षा यांना मुलीची हालचाल होत नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर लग्नसमारंभावर शोककळा पसरली. मृत चिमुरडीची आई प्रतीक्षा काटेकर यांची नुकतीच महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली होती. मुलगी लहान असल्यामुळे त्यांनी सेवेत रुजू होण्यासाठी मुदत मागितली होती. दरम्यान, सध्या राज्यात तापमानात मोठी वाढ झाली असून, उष्माघातामुळेच चिमुरडीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाणे येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास
सुरू आहे.

Four-month-old baby dies of heatstroke on Na Road

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

5 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

5 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

5 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

5 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

5 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

5 hours ago