राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

महाराष्ट्रासह 16 राज्यांत मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

अंतिम मतदारयाद्या ऑक्टोबर 2026 पर्यंत प्रसिद्ध होणार

नवी दिल्ली : प्रतिनिधी
निवडणूक आयोगाने गुरुवारी (दि. 14) मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षणच्या (एसआयआर) तिसर्‍या टप्प्याची घोषणा केली आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करणे, दुबार किंवा मृत मतदारांची नावे वगळणे आणि याद्या अधिक अचूक व पारदर्शक करणे, हा आहे.
या तिसर्‍या टप्प्यात महाराष्ट्रासह देशातील 16 राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे देशभरातील सुमारे 36.73 कोटी मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.
या मोहिमेत प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पंजाब, हरियाणा, ओडिसा, झारखंड आणि ईशान्येकडील राज्यांचा समावेश आहे. मात्र, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लडाख या भागांतील हवामान आणि सुरू असलेल्या शिरगणती कामामुळे या राज्यांचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये या प्रक्रियेनंतर अंतिम मतदार याद्या ऑक्टोबर 2026 पर्यंत प्रसिद्ध केल्या जातील, ज्यामुळे आगामी निवडणुकांसाठी अद्ययावत माहिती उपलब्ध होईल.

30 मेपासून घरोघरी जाऊन पडताळणी

या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी निवडणूक आयोगाने 3.94 लाखांहून अधिक केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) ची नियुक्ती केली आहे, जे 30 मे पासून प्रत्यक्ष घरोघरी जाऊन मतदारांच्या माहितीची पडताळणी करतील. या प्रक्रियेत राजकीय पक्षांच्या 3.42 लाख केंद्रस्तरीय प्रतिनिधीचीही मदत घेतली जाणार आहे. यापूर्वी पार पडलेल्या दोन टप्प्यांत 59 कोटींहून अधिक मतदारांची नोंदणी तपासण्यात आली आहे. तिसर्‍या टप्प्यानंतर केवळ तीन दुर्गम प्रदेश वगळता संपूर्ण देश या विशेष मोहिमेंंतर्गत समाविष्ट होईल.

एसआयआर कार्यक्रम : या मोहिमेची अंमलबजावणी पुढील नियोजित वेळापत्रकानुसार केली जाणार आहे. घरोघरी जाऊन पडताळणी- 30 मे ते 14 ऑक्टोबर 2026, प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करणे- 5 जुलै ते 21 ऑक्टोबर 2026 (टप्प्याटप्प्याने). दावे व हरकती नोंदवणे आहे : प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून निर्दिष्ट कालावधीपर्यंत. अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करणे : ऑक्टोबर 2026 च्या अखेरीस. या प्रक्रियेदरम्यान 3.94 लाख केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्यक्ष भेटी देऊन माहितीची अचूकता तपासणार आहेत.

Final voter lists to be published by October 2026

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

5 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

5 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

6 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

6 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

6 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

6 hours ago