नाशिक

कोट्यवधीतून वारंवार तलावांचे सुशोभीकरण?

त्र्यंबकेश्वर शहरात लोकार्पणापूर्वी तोडफोड, घाणीचे साम्राज्य

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
शहराला प्राचीन तलावांचा वैभवशाली वारसा लाभला आहे. या तलावांचे सुशोभीकरण करण्याच्या नावाने वारंवार कोट्यवधींचा खर्च शासनाच्या विविध विभागांमार्फत केला जातो. त्र्यंबकेश्वर शहराच्या मध्यवर्ती भागात कुशावर्त तीर्थाजवळ असलेल्या इंदाळेश्वर तलावाचे सुशोभीकरणाचे काम राज्य पुरातत्त्व विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी तलावाच्या भिंतीवर प्रसाद योजनेतून टाकलेले ग्रॅनाइट काढण्यात येत आहे.
इंद्राळेश्वर तलाव हा पूर्वापार अस्वच्छतेच्या विळख्यात सापडलेला आहे. शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या घरांची मागची बाजू येते व त्यामुळे या परिसरात केरकचरा, घाण टाकली जाते. इंद्रतीर्थ तलावाची बांधणी सन 1778 मध्ये विष्णू महादेव गद्रे यांनी त्यावेळी 22 हजार रुपये खर्चून केली आहे. दगडी बांधकामातील या तलावाचे बांधकाम आखीवरेखीव असे आहे. बाजूस असलेले कुंड सूर्यरथाची संकल्पना सुंदर अशी आहे. सतत पाणवेलींनी व्यापलेल्या या तलावाच्या बाजूला कचराकुंड्यांचा विळखा पडल्याने या सुंदर शिल्पकलेचा नमुना असलेला तलाव वर्षानुवर्ष दुर्लक्षित आहे.
या तलावाच्या सुशोभीकरणाच्या नावाने आतापर्यंत झालेला खर्च डोळे फिरतील असा आहे. सिंहस्थ 2003 मध्ये या तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले. संरक्षक भिंतीवर लोखंडी रेलिंग करण्यात आले आणि तलावातील पाणवेली काढून त्यात विद्युत रोषणाईसह कारंजा उभारण्यात आला. यासाठी तेव्हा दहा लाखांचा खर्च केला. अल्पावधीत कारंजा अदृश्य झाला. त्यानंतर सिंहस्थ 2015 मध्ये रेलिंग बदलण्यात आले व किरकोळ डागडुजी करत 25 लाख रुपये खर्च केले. त्यानंतर केंद्र शासनाच्या प्रसाद योजनेत या तलावाचे सुशोभीकरण हाती घेण्यात आले. त्यासाठी एक कोटी 77 लाखांची तरतूद केली. सन 2019 मध्ये प्रारंभ झाला. मात्र, प्रत्यक्ष 2022 मध्ये काम सुरू करण्यात आले. ते अगदी अलीकडे 2024 पर्यंत सुरू होते. घाटाच्या भिंतीवर ग्रॅनाइट टाकण्यात आले व रेलिंग बदलण्यात आले. विशेष म्हणजे, या सुशोभीकरणात तलावाच्या भिंतीवर उगवलेली झाडेझुडपेही काढली नाहीत. आता पुन्हा या तलावाचे सुशोभीकरण सुरू झाले आहे. शासनाच्या या उधळपट्टीकडे नागरिक आश्चर्याने बघत आहेत.

Frequent beautification of lakes at the cost of crores?

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

कुत्र्यामुळे सुसाईड नोट लिहून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या

कुत्र्यामुळे सुसाईड नोट लिहून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या शहापूर: प्रतिनिधी 30 वर्षीय बँक कर्मचाऱ्याला भटक्या श्वानानं…

19 minutes ago

पडोसन

पडोसन नावाचा विनोदी चित्रपट तुम्हाला सगळ्यांना आठवत असेलच.... एक -एक पात्र अतिशय विनोदी... तर अशीच…

6 hours ago

फुलोरा…

‘फार फार तर वारा बाहेरून येईल पण फुलून तर आतूनच यावे लागते..’ कविवर्य संजय चौधरी…

6 hours ago

श्रद्धा, ट्रेंड आणि माणूस

नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…

6 hours ago

आवडता कोपरा

खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…

6 hours ago

खंजीर आणि खाज

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…

6 hours ago