चांदवड तालुक्यावर शोककळा; भुताणेत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
चांदवड : वार्ताहर
गरीब शेतकरी कुटुंबातून जिद्दीच्या जोरावर भारतीय नौदलात झेप घेणारा चांदवडचा सुपुत्र, जवान संदीप जगन्नाथ महाले (वय 32) यांना विशाखापट्टणम् येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. रविवारी (दि. 22) त्यांच्या मूळगावी भुताणे येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जनसागराने साश्रू नयनांनी लाडक्या वीरपुत्राला निरोप दिला.
एनसीसीच्या गणवेशातील त्यांचे स्वप्न साकार झाले होते. संदीप महाले यांचे प्राथमिक शिक्षण मूळगावी झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी पिंपळगाव येथील महाविद्यालय गाठले. या महाविद्यालयात असताना एनसीसीमध्ये सहभागी झाल्यापासून त्यांच्या डोळ्यात देशसेवेचे स्वप्न चमकत होते. घरची परिस्थिती हलाखीची असतानाही, त्यांनी हार न मानता शारीरिक कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर 2012 मध्ये भारतीय नौदलात प्रवेश मिळवला. त्यांच्या या यशाने संपूर्ण कुटुंबाला मोठा आधार मिळाला होता.
संदीप हे नौदलात एलटी पदावर कार्यरत होते. त्यांनी सलग 14 वर्षे देशाचे रक्षण केले. सध्या त्यांची नियुक्ती विशाखापट्टणम् येथे होती. 21 फेब्रुवारी 2026 रोजी कर्तव्यावर असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. देशसेवेचे व्रत अखेरच्या श्वासापर्यंत निभावणार्या या जवानाच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शहीद संदीप यांचे पार्थिव रविवारी दुपारी साडेबाराला भुताणे येथे आणण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेत हजारोंचा जनसमुदाय सहभागी झाला होता. ’शहीद संदीप महाले अमर रहे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. जि. प. शाळेच्या पटांगणात पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना सलामी दिली. त्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Navy jawan Sandeep Mahale martyred in the line of duty
सरकारकडे मासिक पाळी स्वच्छतेसाठी धोरण आहे, योजना आहेत, कागदोपत्री आकडे आहेत. पण या धोरणाची अंमलबजावणी…
नेपाळचे राजकारण गेल्या दोन दशकांपासून अस्थिरतेच्या भोवर्यात अडकलेले होते. राजेशाही संपल्यानंतर लोकशाहीची स्थापना झाली असली…
पश्चिम बंगाल, तामिळनाडूमधील मतदान तोंडावर आले असतानाच कोणताही संदर्भ नसताना केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात संसदेचे…
आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे तंत्रज्ञान वेगाने सर्व क्षेत्रांमध्ये प्रवेश करत आहे. शिक्षण…
रोजचं वर्तमानपत्र वाचलं, वृत्तवाहिन्या पाहिल्या तसेच समाजमाध्यमावर फेरफटका मारला तरी महाराष्ट्राच्या अब्रूचे धिंडवडे निघालेले दिसतील.…
संपलेल्या दहा दिवसांत समाजातील दोन प्रकार मी जवळून बघितले. एक प्रकार म्हणजे कोकणातून मजुरीसाठी आलेले,…