नाशिक

इंधन दरवाढीचा बळीराजाला फटका; ट्रॅक्टर मशागतीचे दर वाढले

सिन्नर : प्रतिनिधी
खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना वाढत्या डिझेल दराने शेतकर्‍यांच्या अडचणीत भर घातली आहे. ट्रॅक्टरद्वारे करण्यात येणार्‍या मशागतीच्या विविध कामांचे दर वाढल्याने यंदा पेरणीपूर्व तयारीसाठी शेतकर्‍यांना अधिक खर्चाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे आधीच वाढत्या उत्पादन खर्चाने त्रस्त असलेल्या बळीराजाचे आर्थिक गणित पुन्हा एकदा बिघडण्याची चिन्हे आहेत.
डिझेलच्या किमतीत झालेल्या वाढीचा परिणाम ट्रॅक्टर मशागतीच्या दरांवर झाला असून नांगरणी, पेरणी, रोटाव्हेटर आणि फणणी यांसारख्या कामांच्या दरात 200 ते 500 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी नांगरणीसाठी प्रति एकर दोन हजार ते दोन हजार 200 रुपये खर्च येत होता. तो यंदा दोन हजार 500 रुपयांवर पोहोचला आहे. सोयाबीन व इतर पारंपरिक पिकांच्या पेरणीसाठी एक हजार 500 रुपये, तर मका पेरणीसाठी एक हजार 600 ते एक हजार 800 रुपये दर आकारले जाणार आहेत.
रोटाव्हेटरच्या कामासाठी प्रतिएकर दोन हजार 500 रुपये, तर फणणी अथवा पाळीसाठी एक हजार 200 रुपये खर्च येत आहे. जेसीबीच्या कामाचे दरही प्रतितास एक हजार रुपयांवरून एक हजार 200 रुपयांपर्यंत वाढले आहेत. सध्याच्या डिझेल दरानुसार हे नवीन दर निश्चित करण्यात आले असल्याचे ट्रॅक्टर चालकांनी सांगितले.
दरम्यान, मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकर्‍यांसमोर उत्पादन खर्च वाढीचे नवे संकट उभे राहिले आहे. बियाणे, खते, औषधे आणि मशागतीचा वाढता खर्च यामुळे शेती परवडणे कठीण होत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. भविष्यात इंधन दर आणखी वाढल्यास मशागतीचे दरही वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गेल्या वर्षीचा दर (रुपये)        यंदाचा दर (रुपये)      वाढ (रुपये)
नांगरणी – 2000 ते 2200              2500                        300 ते 500
पारंपरिक पिके/सोयाबीन पेरणी
1200                                             1500                        300
मका पेरणी
1400                                    1600 ते 1800                  200 ते 400
रोटाव्हेटर
2000                                          2500                          500
फणणी/पाळी
1000                                         1200                            200
जेसीबी (प्रतितास)
1000                                        1200                            200

Fuel price hike hits Baliraja; Tractor tillage prices increase

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

20 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

20 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

20 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

20 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

21 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

21 hours ago