बांधकामाची प्रतीक्षा, शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
ओझर : वार्ताहर
ओझर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेची मोडकळीस आलेली जुनी इमारत पाडून तब्बल चार ते पाच महिने उलटून गेले असले तरीही नव्या इमारतीच्या बांधकामाला अद्याप सुरुवात झालेली नाही.
आमदार दिलीप बनकर यांनी उर्दू शाळेच्या नवीन इमारतीसाठी 50 लाखांचा निधी मंजूर करून दिला असतानाही प्रत्यक्ष काम रखडले असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. जुनी इमारत पाडल्यानंतर उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांची तात्पुरती व्यवस्था जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेत केली आहे. शासनाकडून निधी मंजूर होऊनही प्रत्यक्ष बांधकामास विलंब होत असल्याने शिक्षण विभाग व संबंधित प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची भावना पालकांमध्ये असून, याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन नव्या इमारतीच्या बांधकामाला त्वरित सुरुवात करावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल, असा इशारा दिला आहे.
पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर होऊनही उर्दू शाळेच्या नव्या इमारतीचे काम अद्याप सुरू न होणे ही दुर्दैवी बाब आहे. जुनी इमारत पाडल्यानंतर महिन्यांनंतरही प्रत्यक्ष बांधकामाला मुहूर्त सापडत नाही, हे प्रशासनाचे अपयश आहे. काम केवळ कागदावरच आहे, प्रत्यक्षात काहीच घडत नाही.
– जाकिर कुरेशी, नागरिक, ओझर‘ऊर्दू शाळेच्या इमारतीअभावी मुलांना दुसर्या शाळेत तात्पुरत्या स्वरूपात शिक्षण घ्यावे लागत आहे. अभ्यासावर परिणाम होत आहे. निधी मंजूर असूनही काम सुरू न होणे हे अन्यायकारक आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन नव्या शाळा इमारतीचे काम सुरू करावे. – तोसिफ पठाण, पालक, ओझर
Fund of Rs 50 lakhs approved; Urdu school building only on paper
- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…
- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…
- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…
- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…
तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…
रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…