मोजणीसाठी पैसे भरूनही शेतकर्यांच्या पदरी निराशा
देवळाली कॅम्प : प्रतिनिधी
नाशिक तालुक्यातील सीबीएस परिसरातील भूमी अभिलेख कार्यालयाच्या कामकाजाबाबत नागरिक आणि शेतकर्यांकडून गंभीर तक्रारी होत असल्याचा आरोप समोर आला आहे. जमिनीची मोजणी, नकाशे मिळवणे आणि मोजणीनंतर प्रत्यक्ष हद्दी दाखवून घेणे यांसारख्या कामांसाठी आवश्यक शुल्क भरूनही अनेक हेलपाटे मारावे लागत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे वेळ आणि पैसा खर्च करून कार्यालयात येणार्या शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.
तालुक्यातील विविध गावांमधून शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक आपल्या जमिनीशी संबंधित कामांसाठी या कार्यालयात येतात. मात्र, मोजणीची प्रक्रिया पूर्ण करणे, आवश्यक नकाशे उपलब्ध करून देणे आणि संबंधित कागदपत्रे देणे यासाठी टाळाटाळ होत असल्याचा आरोप तक्रारदारांकडून केला जात आहे. कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचारी नागरिकांना समाधानकारक उत्तरे देत नसल्याने त्यांची गैरसोय वाढत असल्याचे ही सांगितले जाते. मोजणीसाठी अधिकृत शुल्क भरल्यानंतरही कामे वेळेत होत नसल्याची तक्रार आहे. काही प्रकरणांत प्रत्यक्ष मोजणी न करता प्रकरणे निकाली काढली जात असल्याचा, तसेच पुन्हा मोजणीसाठी शेतकर्यांना अतिरिक्त शुल्क भरावे लागत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. उपअधीक्षक मनोज संधान यांच्याकडे शेतकरी तक्रार घेऊन गेल्यास ते शेतकर्यांशी अरेरावीची भाषा करतात आणि त्यांच्या तक्रारींचे समाधानकारक निराकरण करत नाहीत, असा आरोप करण्यात येत आहे. तसेच, शेतकरी भेटण्यासाठी गेल्यास त्यांना तासन्तास कार्यालयाबाहेर थांबवून ठेवले जाते, अशीही तक्रार आहे. कार्यालयातील रेकॉर्ड विभागात कार्यरत असलेले शिपाई हे पैसे देणार्या व्यक्तींची कामे लवकर करून त्यांना आवश्यक रेकॉर्ड उपलब्ध करून देतात. तर पैसे न देणार्या शेतकर्यांची कामे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवून त्यांना वारंवार कार्यालयाचे हेलपाटे मारायला लावतात, असा आरोप शेतकर्यांकडून करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकार्यांनी निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणार्यांवर कठोर कारवाई करावी. तसेच, रेकॉर्ड विभागातील कर्मचारी जयसिंग धरम यांची तातडीने अन्यत्र बदली करावी, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून करण्यात येत आहे.
नाशिक भूमी अभिलेख कार्यालयाशी संबंधित एका कथित मोठ्या घोटाळ्याचा आणि अधिकारी-कर्मचार्यांवरील कारवाईचा उल्लेखही तक्रारदारांकडून केला जात आहे. यापूर्वीच्या प्रकरणात नेमकी कोणती कारवाई झाली, किती कर्मचार्यांवर कारवाई करण्यात आली आणि त्यानंतर कार्यालयाच्या कामकाजात काय सुधारणा झाली, याची अधिकृत माहिती सार्वजनिक होणे आवश्यक आहे.
वरिष्ठ अधिकार्यांनी चौकशी करण्याची मागणी
भूमी अभिलेख कार्यालयातील कथित अनियमितता, मोजणीतील दिरंगाई, नकाशे देण्यास होणारा विलंब आणि नागरिकांच्या तक्रारी यांची वरिष्ठ अधिकार्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. संबंधित प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दोष आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, तसेच मोजणी व नकाशांशी संबंधित प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी अपेक्षा शेतकरी व नागरिकांकडून व्यक्त केली जात आहेत.
माझा सर्व्हे नंबर 93/2, मोजे लोहशिंगवे, नाशिक असून, मी जुलै 2026 मध्ये मोजणी अर्ज केला होता. संबंधित कर्मचार्यांनी ऑगस्ट 2026 रोजी येथे मोजणी करण्यासाठी व हद्दीखुणा न दाखवता निघून गेले. त्यानंतर दोन महिन्यांनी मी त्यांना संपर्क केला असता तुम्हाला आधी दाखवता येणार नाही, असे उत्तर त्यांनी दिले. त्यामुळे माझा गेलेला वेळ व पैसा वाया गेला.
– तानाजी कचरू जुद्रे, सैनिक व शेतकरी, लोहशिंगवे, नाशिक
Nashik Land Records Department operations mired in controversy
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…