राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

जी-20 परिषद : ट्रम्प यांच्या भेटीत पीएम मोदी पहिल्या स्थानी

सर्जिओ गोर : भारत-अमेरिका संबंध, व्यापार करारावर भाष्य

वॉशिग्टन : येत्या जी-20 परिषदेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ज्या नेत्यांना भेटू इच्छितात, त्या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांत वरच्या स्थानी असतील. दोन्ही नेत्यांमधील मैत्री आणि दोन देशांमधील वाढते संबंध यामुळे हे शक्य होत आहे, असे अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर म्हणाले. डिसेंबरमध्ये होणारी जी-20 परिषद खास असेल, असेही गोर म्हणाले.
सर्जिओ गोर यांनी सांगितले की, डिसेंबरमध्ये होणार्‍या जी-20 परिषदेसाठी पंतप्रधान मोदी फ्लोरिडाला भेट देतील. यावेळी ट्रम्प आणि मोदी यांची होणारी भेट केवळ परिषदेपुरती मर्यादित न राहता अधिक खास असेल, असे गोर म्हणाले. जर तुम्ही ट्रम्प यांना विचारले की, परिषदेला आलेल्या 35 नेत्यांपैकी तुम्हाला कोणाला भेटायला आवडेल? तर पंतप्रधान मोदी त्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असतील. ट्रम्प मोदींना चांगले मित्र मानतात. त्यामुळे या भेटीत केवळ बैठकीपेक्षा अधिक काहीतरी घडेल, अशी मला अपेक्षा आहे, असे गोर पुढे म्हणाले. ट्रम्प पुढील वर्षी भारताला भेट देण्याची शक्यता गोर यांनी व्यक्त केली. भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत बोलताना गोर यांनी दोन्ही देश कराराच्या खूप जवळ पोहोचले आहेत, असेही सांगितले. येत्या काही महिन्यांत हा करार अंतिम होईल, अशी आशादेखील गोर यांनी व्यक्त केली. भारतातील राजकीय आणि आर्थिक स्थिरता अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे मतदेखील गोर यांनी या मुलाखतीत बोलताना मांडले. भारताची प्रगती आमच्यासाठी चांगली बाब आहे. आम्हाला स्थिर भारताशी काम करायचंय, असे त्यांनी नमूद केले.

भारत-अमेरिका संरक्षण भागीदारीवर भाष्य
भारत अमेरिकेचा विश्वासू संरक्षण भागीदार असल्याचे गोर म्हणाले. हे नातं केवळ लष्करी उपकरणांच्या विक्रीपुरते मर्यादित नाही, तर ते विश्वासावर आधारित आहे. अमेरिका जगातील प्रत्येक देशाला आपली लष्करी उपकरणे विकत नाही. भारत जेवढे लष्करी सराव अमेरिकेसोबत करतो, तेवढे इतर कोणत्याही देशासोबत करत नाही, असे गोर म्हणाले. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ‘क्वाड’ हे संघटन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे गोर म्हणाले.

G-20 Summit: PM Modi takes top spot in meetings with Trump.

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

3 hours ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

3 hours ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

3 hours ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

3 hours ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

4 hours ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

4 hours ago