जीवन संपवण्यामागचे धक्कादायक कारण आले समोर
धाराशिव : धाराशिवमधून अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी आपल्या तीन लहान मुलांसह ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावरून शंभर फूट खोल दरीत उडी घेतली.
या थरकाप उडवणार्या घटनेत कुस्तीपटू अश्विनी पौळ आणि त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य यांचा जागीच मृत्यू झाला, तर अडीच वर्षांच्या जुळ्या मुलींपैकी क्रांती नावाच्या चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जुळ्या मुलींपैकी दुसरी मुलगी वीरा ही गंभीर जखमी असून, तिच्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत.
अश्विनी पौळ यांनी मुलांना घेऊन आत्महत्येचे पाऊल उचललेल्या या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि क्रीडा जगतातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. पती आणि सासरच्या मंडळींच्या सततच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळूनच मुलीने आत्महत्या केल्याचा अश्विनी यांच्या वडिलांनी गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे घटनेला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. पोलीस अधिकारी याबाबत कसून चौकशी करत आहेत. अश्विनी मनोहर पौळ असे या महिला कुस्तीपटूचे नाव असून, तिला कुस्ती क्षेत्रात ’महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखले जात होते. राष्ट्रीय स्तरावर कुस्तीत नाव कमावलेल्या अश्विनी पौळ यांनी आपल्या कारकिर्दीत 5 सुवर्ण आणि 6 रौप्य पदके जिंकून महाराष्ट्राचा गौरव वाढवला होता. अश्विनी मोहिते (विवाहानंतर अश्विनी मनोहर पौळ) या धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील व्हंताळ गावच्या रहिवासी आणि राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटू होत्या. त्यांच्या वडिलांनी मुलीच्या सरावासाठी घरातच कुस्तीची तालीम सुरू केली होती.
Wrestler Ashwini Paul jumps from Naldurg with three children
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…