मनमाडला गजानन महाराज प्रकट दिन सोहळा उत्साहात
मनमाड (प्रतिनिधी) :- शेगावचे गजानन महाराज यांचा प्रकट दिन सोहळा व मनमाड येथील गजानन महाराज मंदिर रौप्य महोत्सव कार्यक्रम मनमाड शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला येथील नांदगाव रोडवरील असलेल्या ललवाणी परिवाराच्या गजानन महाराजांच्या मंदिर समिती तर्फे हा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी श्रीकृष्ण राधा महाकाली यांचा जिवंत देखावा करण्यात आला.सकाळी आरती त्यानंतर पालखी पूजेने या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली शहरातील विविध मान्यवरांच्या हस्ते पुजन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गाने मिरवणूक काढण्यात आली यावेळी शहरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेगावच्या गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा व मनमाड येथील गजानन महाराज मंदिर रौप्य महोत्सव वर्ष कार्यक्रम आज मनमाड शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मनमाड नांदगाव महामार्गावरील बुरकुलवाडी येथे ललवणी परिवारातर्फे बांधण्यात आलेल्या श्री गजानन महाराज यांच्या मंदिरात प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आज सकाळीच पादुका पूजन श्रींची आरती करून भव्य दिव्य अशा मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली ललवाणी यांच्या निवासस्थानावरून श्रींच्या पादुकांची व त्यांच्या फोटोची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली आजच्या या मिरवणुकीला राधा कृष्ण इतर देवी देवतांचे जिवंत देखावे करण्यात आले होते यामध्ये शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक मार्गावर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती भव्य अशी आतिषबाजी यासह रंगीबेरंगी आतिषबाजीचा वर्षाव करण्यात आला यानंतर दुपारी गजानन महाराजांच्या मंदिरात मान्यवरांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली या आरतीनंतर भव्य असा महाप्रसादाचा वाटप करण्यात आले. जवळपास दहा हजार लोकांना यावेळी महाप्रसाद म्हणून भोजनदान करण्यात आले गेल्या 24 वर्षांपासून मनमाड शहरात ही परंपरा सुरू आहे यंदा हे 25 वे वर्ष होते म्हणून आज रौप्य महोत्सव वर्षानिमित्ताने भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला मनमाडचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय विनोद ललवाणी यांनी या मंदिराची स्थापना केली असून ते हयात असेपर्यंत एकही वर्षी खाडा न करता गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात आला यानंतर त्यांच्या परिवारातर्फे ही परंपरा आजपर्यंत सुरूच आहे शहरातील सर्व धर्मीय नागरिक या मिरवणुकीत सहभागी होऊन प्रसादाचा लाभ घेतात
ललवणी परिवारातर्फे स्वच्छतेचा संदेश
आधी भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत आतिबाजी करण्यात आली रंगीबेरंगी पताका उडविण्यात आल्या यासह मिरवणुकीत सहभागी झालेल्या महिला पुरुष यासह लहान मुलांना पाणी तसेच कोल्ड्रिंक वाटप करण्यात आले यामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात घाण पडत होती मात्र मिरवणूक पुढे सरकली मागे लगेच स्वच्छता करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी लावले होते यामुळे ज्या ज्या मार्गावरून मिरवणूक केली त्या मार्गावर तात्काळ स्वच्छता करून घेण्यात आली मुळात ललवाणी परिवाराने हा नव्याने उपक्रम करून स्वच्छतेचा नवा संदेश दिला
सिडको: विशेष प्रतिनिधी मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोविंद नगर परिसरात सुरू असलेल्या एका इमारतीच्या…
जिल्हा न्यायालयाबाहेर फ्री स्टाइल नणंद भावजयींनी झिंज्या उपटल्या सिडको : विशेष प्रतिनिधी पतीच्या निधनानंतर पत्नीने…
व्यक्ती विशेष देवयानी सोनार पर्यटनातून ‘परमार्थ’ लोकांना पर्यटन, तीर्थयात्रा घडविण्यासह इतरांना ज्याच्यातून…
नाशिक: प्रतिनिधी नाशिकरोड येथे एका युवकाचा दगड टाकून तसेच धारदार हत्याराने वार करून निर्घृणपणे खून…
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा नाशिक: प्रतिनिधी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने मोठा…
दहा हजारांची लाच घेताना वनविभागाचे दोघे जाळ्यात नाशिक : प्रतिनिधी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना…