सिडको : विशेष प्रतिनिधी
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी विशेष कोम्बिंग ऑपरेशन आणि नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या आदेशानुसार झालेल्या या कारवाईत परिमंडळ क्रमांक 1 मधील विविध पोलीस ठाण्यांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व कर्मचार्यांनी सहभाग घेतला.
या मोहिमेदरम्यान पोलिसांनी 8 हिस्ट्रीशीटर, घरफोडीच्या गुन्ह्यातील 11 आरोपी, मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील चार आरोपी तसेच शस्त्र अधिनियमाशी संबंधित पाच आरोपींची तपासणी केली. संत कबीर नगर परिसरात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम 65(ई) अंतर्गत एका व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरणे, गोंधळ घालणे किंवा संशयास्पद हालचाली करणार्या 55 जणांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. त्यामुळे परिसरात काही काळ पोलीस बंदोबस्त आणि तपासणीची कडक अंमलबजावणी दिसून आली.
वाहन तपासणीसाठी कॉलेज रोड चौकी, टायटन शोरूमसमोरील परिसर आणि बापू पूल येथे नाकाबंदी करण्यात आली. या वेळी 54 वाहनांची तपासणी करण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या 10 दुचाकीस्वारांवर ट्रिपल सीट प्रवास केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली.या विशेष मोहिमेत 13 पोलीस अधिकारी आणि 57 पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Gangapur police take action against 55 loafers.
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…