सिडको : विशेष प्रतिनिधी
वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील वनवैभव परिसरात महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागून एमएनजीएलची भूमिगत गॅसवाहिनी फुटल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरातील गॅसपुरवठा सुमारे दोन ते अडीच तास बंद ठेवावा लागल्याने हजारो नागरिकांची गैरसोय झाली.
दरम्यान जूनच्या प्रारंभीच शहरात कोणत्याही कामांसाठी खोदकाम करण्यासाठी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी लेखी मनाई हुकूम काढला आहे. ठेकेदारांकडून शहरात विविध ठिकाणी सर्रास खोदकाम सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
महापालिकेतर्फे भूमिगत पाणीपुरवठा पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असताना दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. खोदकामादरम्यान जेसीबीचा धक्का भूमिगत गॅसवाहिनीला लागल्याने गॅस गळती सुरू झाली. संभाव्य धोका लक्षात घेऊन एमएनजीएलकडून तातडीने संबंधित भागातील गॅसपुरवठा बंद करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच एमएनजीएलचे अधिकारी आणि तांत्रिक कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर गॅसपुरवठा पूर्ववत करण्यात आला. या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा अन्य नुकसान झाले नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, अचानक गॅसपुरवठा खंडित झाल्याने वनवैभव परिसरासह आसपासच्या भागातील सुमारे एक ते दीड हजार नागरिकांना स्वयंपाक आणि इतर दैनंदिन कामांमध्ये अडचणींचा सामना करावा लागला. खोदकाम करताना आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. शहरात विविध विकासकामांच्या खोदकामादरम्यान गॅसवाहिन्या किंवा इतर भूमिगत सेवा वाहिन्यांचे नुकसान होण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. त्यामुळे महापालिका, ठेकेदार आणि सेवा पुरवठादार संस्थांमध्ये अधिक प्रभावी समन्वय आणि सुरक्षाविषयक नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे.
MNGL gas pipeline ruptured during excavation work.
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…