भगूर शहरात कचरा, प्रदूषणाचे साम्राज्य

नगरपरिषदेच्या उदासीनतेवर नागरिक संतप्त

देवळाली कॅम्प : प्रतिनिधी
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जन्मभूमी म्हणून ओळखले जाणारे भगूर शहर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी असणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात मात्र येथे घाण व प्रदूषणाचे साम्राज्य पसरल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.
भगूर नगरपरिषदेच्या हद्दीतील वंजारी गल्ली परिसरात असलेल्या सरकारी शौचालयाजवळ काही ठराविक घरांतील नागरिकांकडून दररोज कचरा टाकला जात असून, तो परस्पर जाळून विल्हेवाट लावली जात आहे. विशेष म्हणजे, नगरपरिषदेची घंटागाडी दररोज ठरलेल्या वेळेत नियमितपणे येत असतानाही स्थानिक नागरिक कचरा घंटागाडीत न टाकता त्याच ठिकाणी आणून टाकतात. कचरा साचल्यानंतर तो जाळला जात असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरते. सडलेला कचरा, कपडे, प्लास्टिक व अन्य साहित्य जाळल्यामुळे निर्माण होणार्‍या धुराचा आणि घाण वासाचा मोठा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

या गंभीर प्रकाराबाबत नगरपरिषद कार्यालयात अनेक वेळा तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. स्वातंत्र्यवीरांच्या जन्मभूमीत अशी अस्वच्छता व प्रदूषण राहणे ही बाब अत्यंत लज्जास्पद आहे. नगरपरिषदेने याची तातडीने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी. परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात.
– डॉ. संजय नाईक, स्थानिक नागरिक, भगूर

Garbage and pollution reign in Bhagur city

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *