स्वयंपाक करताना गॅसचा स्फोट ; महिला जखमी

स्वयंपाक करताना गॅसचा स्फोट ; महिला जखमी

सातपूर: प्रतिनिधी

श्रमिकनगर येथील गंगासागर नगर परिसरात घरात स्वयंपाकघरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन ३६ वर्षीय महिला जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली. गॅस गळती होऊन हा स्फोट झाला असण्याची शक्यता अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आली आहे. या स्फोटानंतर लागलेल्या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले सोनाली रवींद्र साळवे (वय ३६) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर साईबाबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
श्रमिक नगर येथील गंगासागर नगर परिसरात साळवे कुटुंबीय राहतात. दुपारी बाराच्या सुमारास सोनाली या स्वयंपाकघरात काम करत होत्या. अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आणि आग लागली. यामध्ये सोनाली या गंभीर जखमी झाल्या. स्फोटानंतर घरातील साहित्याला आग लागली. तत्काळ नागरिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली.सातपूर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या वेळी किचन व हॉलमधील कपडे व इतर साहित्याला आग लागली होती. जवानांनी घरात घुसून आग आटोक्यात आणली. त्यापुर्वी घरात असणारे सिलिंडर बाहेर काढले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली घटनास्थळी नगरसेवक दिनकर पाटील. अमोल पाटील. हे देखील दाखल झाले होते. पोलिसांकडून तपास चालू आहे

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

15 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

15 hours ago