पश्चिम बंगालमध्ये दीदी आऊट, केरळ, तामीळनाडूत सत्तांतर

ममता बॅनर्जींचा पराभव
तामीळनाडूत मुख्यमंत्री स्टॅलिन पराभूत
केरळमध्ये दशकानंतर काँग्रेसचे कमबॅक
विजय थलापतींचा करिश्मा

नवी दिल्ली : देशातील राजकीय भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या पश्चिम बंगालसह तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये तीन राज्यांत भाजपाचे ’कमळ’ फुलले. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये भाजपाने द्विशतक गाठत ममतादीदींच्या पंधरा वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला. विशेष म्हणजे, भवानीपूर या मतदार संघातून ममता दीदी यांचा मोठा पराभव झाला. भाजपाचे शुभेंदु अधिकारी यांनी त्यांचा पंधरा हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. तामिळनाडूतही मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांना पराभव पत्कारावा लागला. डाव्यांचा एकमेव गड असलेल्या केरळमध्ये काँग्रेसने सत्ता मिळविली. तामिळनाडूत अभिनेता थलापती विजयने चमत्कार घडविला आहे.

पश्चिम बंगालच्या राजकारणात एक ऐतिहासिक परिवर्तन घडून आले आहे. गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मतदारांनी नाकारले असून, भारतीय जनता पक्षाने ’बंपर’ विजयासह बंगालचा गड सर केला आहे. दीदी, टाटा बाय-बाय! म्हणत बंगालच्या जनतेने परिवर्तनाला कौल दिला आहे.
भाजपने पूर्वेकडील हा आपला अंतिम गड सर करून भारतीय राजकारणात स्वतःचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
पश्चिम बंगालमध्ये 207 जागांवर भाजपने मुसंडी मारली असून, तृणमूल काँग्रेसला केवळ 80 जागा प्राप्त झाल्या आहेत. डावे पक्ष, काँग्रेस व अपक्ष यांना प्रत्येकी दोन जागा
मिळाल्या.
ममता बॅनर्जी यांच्या पराभवाचे सर्वांत मोठे कारण म्हणजे ’आरजी कर मेडिकल कॉलेज’मधील बलात्कार आणि हत्या प्रकरण ठरले. या घटनेनंतर संपूर्ण बंगालमध्ये विशेषतः महिला आणि तरुण मतदारांमध्ये प्रचंड संताप होता. सरकारने हे प्रकरण हाताळताना दाखवलेली असंवेदनशीलता आणि त्यानंतर डॉक्टरांनी केलेले मोठे आंदोलन यामुळे ममता बॅनर्जी यांची ’महिला रक्षक’ ही प्रतिमा डागाळली गेली.
चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात कोणाची सत्ता असणार, याबद्दलचे चित्र स्पष्ट झाले. चार राज्यांपैकी सर्वाधिक लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये ममतादीदी यांच्या पंधरा वर्षांच्या सत्तेला भाजपाने यावेळी सुरुंग लावला. सत्तेबरोबरच त्यांना आमदारकीही गमवावी लागली. भाजपाने येथे 206 जागा जिंकल्या. तृणमूल काँगेसला 79 जागा मिळाल्या. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मोठा झटका या निवडणुकीत बसला आहे. निवडणुकीच्या ऐन धामधुमीत तृणमूलची निवडणूक रणनीती सांभाळणार्‍या ’आय-पॅक’ या संस्थेवर पडलेले छापे पक्षासाठी मोठे नुकसानकारक ठरले. या छाप्यांमुळे तृणमूलची संपूर्ण रणनीती आणि नियोजन विस्कळीत झाले.
मुर्शिदाबाद हिंसाचार आणि बिघडलेली कायदा-सुव्यवस्था
मुर्शिदाबाद येथे झालेला हिंसाचार आणि बंगालमधील कायदा-सुव्यवस्थेची ढासळलेली स्थिती हे देखील पराभवाचे प्रमुख कारण मानले जात आहे. मतदानाच्या विविध टप्प्यांवर झालेली हिंसा आणि मतदारांना धमकावल्याच्या तक्रारींमुळे सर्वसामान्य जनतेमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. शांतता आणि सुरक्षिततेसाठी मतदारांनी भाजपच्या ’डेव्हलपमेंट आणि सुरक्षा’ अजेंड्याला पसंती दिली. भाजपच्या या ऐतिहासिक विजयानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एडिटिंग, मिक्सिंग करून तो आता व्हायरल होत आहे. याच व्हिडीओत त्यांनी काही दिवसांपूर्वी, दीदी, टाटा बाय-बाय! चे भाकीत केले होते. या व्हिडिओत शहा यांनी बंगालमधील कार्यकर्त्यांच्या संघर्षाचे कौतुक केले होते. आता, हा विजय बंगालच्या अस्मितेचा आणि विकासाचा आहे, अशी शहा यांची प्रतिक्रिया आहे.

आजपासून प. बंगाल भयमुक्त : पंतप्रधान मोदी

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल सोमवारी (दि. 4) जाहीर झाले. पश्चिम बंगालमध्ये ’कमळ’ फुलवण्याचे भाजपाचे अनेक वर्षांचे स्वप्न आज साकार झाले आहे. त्यासोबतच आसाममध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवला असून, पुद्दुचेरीची विधानसभा निवडणूकही जिंकली आहे. तामिळनाडूमध्ये अभिनेता थलापती विजयने ब्लॉक बस्टर विजय मिळवून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. केरळमध्ये काँग्रेस दहा वर्षांनतर पुन्हा सत्तेत विराजमान होणार आहे. महाराष्ट्रातील बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी तब्बल दोन लाख 18 हजारांहून अधिक मतांनी विक्रमी विजयाची नोंद केली आहे.

15 वर्षांची प्रस्थापित विरोधी लाट

एकाच पक्षाची 15 वर्षे सत्ता राहिल्याने मतदारांमध्ये निर्माण झालेला ’राजकीय थकवा’ (फॅटिग) यावेळी स्पष्टपणे दिसून आला. बेरोजगारी, भ्रष्टाचार (विशेषतः भरती घोटाळे) आणि स्थानिक पातळीवरील नेत्यांची ’कमिशनखोरी’ यामुळे ग्रामीण बंगालमध्ये तृणमूलविरोधात मोठे वातावरण तयार झाले होते. याउलट पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील विकासाचा ’नॅरेटिव्ह’ मतदारांना अधिक प्रभावी वाटला.

Lotus blossomed in the three kingdoms

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

33 seconds ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

13 minutes ago

नॉन क्रिमीलेअर मर्यादा पंधरा लाख

ओबीसी उपसमितीच्या बैठकीत निर्णय, 43 नव्या जातींच्या समावेशाचा प्रस्ताव मुंबई : राज्यातील ओबीसी समुदायासाठी एक…

50 minutes ago

मोटेगावकरच्या मुलासह विद्यार्थी, पालक रडारवर

नीट पेपरफुटी प्रकरण; सीबीआयकडून झाडाझडती मुंबई : नीट पेपरफुटीचा कट शिवराज मोटेगावकरने त्याच्या साथीदारांना हाताशी…

1 hour ago

काटकसर-पर्व

पश्चिम बंगाल निवडणुकांच्या काळात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशाच्या आर्थिक स्थितीविषयी चिंता व्यक्त केली…

23 hours ago

माय मराठीसह बोलीभाषांचा जागर; आगळावेगळा पुस्तक प्रकाशन सोहळा

माय मराठीच्या अहिराणी, मावची, भिली, लेवा पाटीदार, कातोडी, सामवेदी, माडिया, गोंडी, पावरा, देहवाली, कोरकू, आंध,…

23 hours ago