पंचवटी : प्रतिनिधी
पेठरोडवरील मेहेरधाम शिवतेजनगरला बालाजी रो-हाउसमध्ये गॅसगळती होऊन घरगुती सिलिंडरचा स्फोट झाल्याने घरात आग लागून संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. ही घटना गुरुवारी (दि.25) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. घरात कोणी नसल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. या घटनेची माहिती मिळताच पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवत स्फोट झालेले व दुसरे भरलेले सिलिंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.
मेहेरधाम परिसरात बालाजी रो-हाउस असून, त्या ठिकाणी सोनाली महाले या राहतात. सकाळी नेहमीप्रमाणे त्या घरातील काम आटोपून कामावर गेल्या असताना सकाळी साडेदहा वाजेच्या सुमाराला अचानकपणे सिलिंडरचा मोठा स्फोट झाला.
काहीतरी फुटल्याचा आवाज झाल्याने शेजारी राहणार्या काही नागरिकांनी महाले यांच्या घराकडे धाव घेतली. घरातून धूर निघून आग लागली असल्याचे
निदर्शनास आले.
त्यानंतर काही नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती कळविली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पंचवटी अग्निशमन दलाचे जवान तसेच नगरसेवक दीपाली गिते यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पंचवटी केंद्रावरील अधिकारी संजय कानडे, लिडिंग फायरमन एस. डी. जाधव, लिडिंग फायरमन बी. पी. लहांगे, लिडिंग फायरमन एस. बी. शिलावट, ट्रेनी फायरमन दिनेश चारोस्कर, सिद्धांत गोतीस, मेहुल उगले आदींनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
Gas leak in a row house at Shivtejanagar: Cylinder explosion
आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…
किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…
घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…
शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…
दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…
708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…