दोन संशयितांना अटक; चार लाखांची रोकड हस्तगत
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
मुंबईहून पत्नीच्या उपचारासाठी सहा लाख रुपयांची रोकड घेऊन आलेल्या प्रवाशाला गंडा घालणार्या रिक्षाचालकाचा नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने छडा लावला आहे. पोलिसांनी अत्यंत फिल्मी स्टाइलने डमी प्रवासी बनून सलग दोन ते तीन दिवस रिक्षांमध्ये फिरून या टोळीचा पर्दाफाश केला. याप्रकरणी मुख्य संशयित रिक्षाचालकासह त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चार लाख रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण 6 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
काठेगल्ली येथील रहिवासी सौरभ गिरीश आहेर (वय 30) हे 20 जून रोजी पत्नीच्या वैद्यकीय उपचारासाठी 6 लाख रुपयांची रोख रक्कम चॉकलेटी रंगाच्या बॅगेत घेऊन मुंबई-ठाणे येथून रेल्वेने नाशिकरोड येथे आले होते. स्टेशनबाहेर घरी जाण्यासाठी रिक्षा शोधत असताना एका चालकाने त्यांना काठेगल्ली येथे सोडण्याचे कबूल केले. आहेर यांनी पैशांची बॅग रिक्षात ठेवली आणि भाड्यासाठी सुट्टे पैसे घेण्यासाठी ते बाजूला झाले. याच संधीचा फायदा घेऊन रिक्षाचालक बॅगेसह क्षणार्धात फरार झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. सुरुवातीला परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता कोणताही धागादोरा हाती लागला नाही. त्यामुळे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे आणि योगेश रानडे यांनी वेगळी रणनीती आखली. पोलिसांनी प्रवासी बनून नाशिकरोड ते नाशिकदरम्यान चालणार्या वेगवेगळ्या रिक्षांमधून दोन-तीन दिवस प्रवास केला. अखेर एका रिक्षाचालकाकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, संशयित रिक्षाचालक मोईन कुरेशी (रा. वडाळा नाका, जुने नाशिक) यानेच 6 लाखांची बॅग लंपास केली आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 23 जून रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी आणि पथकाने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते नाशिकरोड स्टेशन परिसरात दिवसभर सापळा रचला. सायंकाळच्या सुमारास संशयित रिक्षा घेऊन येत असताना मोईन कुरेशी याला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांनी खाकीचा खाक्या दाखवताच मोईनने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून पंचांसमक्ष दोन लाख रुपये हस्तगत करण्यात आले. पुढे तपासात त्याने त्याचा साथीदार शहबाज सय्यद (रा. कथडा, जुने नाशिक) याचे नाव सांगितले, पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन लाख रुपये जप्त केले. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींनी चौकशीत सांगितले की, त्यांनी चोरलेले सहा लाख रुपये आपापसात वाटून घेतले होते.
Rickshaw driver who stole bag containing ₹6 lakh put behind bars.
आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…
किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…
घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…
शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…
दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…
708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…