नाशिक

दिवाळीसाठी बाजारपेठेत गिफ्ट्स दाखल

भेटवस्तू देण्याचा ट्रेंड, दुकानांसमोर विविध ऑफर्सचे फलक

नाशिक : प्रतिनिधी
दिवाळी खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठेत गर्दी होत आहे. दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी गिफ्ट म्हणून ग्रीटिंग, ड्रायफ्रूट्स, परफ्युम्स, वॉलेट, घड्याळ, डायरी व पेनड्राइव्ह दिला जातो. मित्रमंडळी, जवळच्या नातेवाइकांना थेट भेटून किंवा कुरिअरने गिफ्ट पाठवले जाते. विविध कंपन्या, संस्थांनी आपल्या कर्मचार्‍यांना गिफ्ट देण्यासाठी मिठाई बॉक्सला पसंती दिली आहे.
वर्षातला सर्वांत मोठा सण दिवाळी असल्याने सर्वांच्या घरी आनंदी, उत्साही वातावरण असते. एकमेकांना आनंदाची देवाणघेवाण केली जाते. यानिमित्ताने नाते घट्ट करण्यासाठी विविध वस्तू, ड्रायफ्रूट्स व मिठाई दिली जाते. चिनी भांडी, कपबशी, जार, थर्मास, कीचेन, पितळी वॉटर बॉटल, महागडे घड्याळ, हस्तनिर्मित वस्तू, वॉलेट, क्रॉकरी, बॅग्ज भेट म्हणून दिले जात आहे. आकर्षक पद्धतीने पॅकिंग करून देण्याकडे सध्याचा कल आहे. किमान 100 ते 700 रुपये असा विविध वस्तूंचा दर आहे. भेटवस्तूंसोबत शुभेच्छा संदेश असलेले ग्रीटिंगही दिले जात आहे. बदाम, पिस्ता, मनुके, अंजीर, काजू अशा ड्रायफ्रूट्सह पॅकिंग बॉक्सला मोठी मागणी आहे. आकार व वजनानुसार कमीत कमी 200 ते दहा हजारांपर्यंत दर आहेत. लहान मुले असलेल्या घरांत चॉकलेट बॉक्स घेतला जात आहे. गेल्या काही वर्षांत अशा प्रकारचे गिफ्ट्स देण्याचा ट्रेंड आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गिफ्ट विक्रीच्या दुकानांसमोर वेगवेगळ्या ऑफर्सचे फलक लागले आहेत. लकी ड्रॉ व विशिष्ट रकमेवर खरेदी केल्यास गिफ्ट दिले जात आहे.

आकर्षक भेटवस्तूंचे दर

मिठाई बॉक्स- 150 ते 1000 रुपये
चॉकलेट्स बॉक्स- 100 ते 2000 रुपये
ड्रायफ्रूट्स बॉक्स- 200 ते 10,000 रुपये
ग्रीटिंग- 50 ते 500 रुपये

 

ई-शुभेच्छांच्या युगातही भेटवस्तूचे महत्त्व

व्हॉट्सअ‍ॅप, टेक्स मेसेज, फेसबुक व इन्स्टाग्राम अशा माध्यमांतून शुभेच्छा देणार्‍यांची संख्या मोठी
आहे. मात्र, अनेक जण पारंपरिक पद्धतीने गिफ्ट देऊन, फोनवरून शुभेच्छा देत आहेत. कॉर्पोरेट कंपन्याही कामगारांना खूश करण्यासाठी महागड्या भेटवस्तू देत आहेत. त्यात कार अ‍ॅक्सेसेरीज, मोबाइल, इलेक्ट्रॉनिक वस्तू दिले जात आहे.

Editorial Team

Recent Posts

दुष्काळप्रश्नी हवी जलद कार्यवाही

- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्‍या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…

4 hours ago

मीच जर नसेल तर?

- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…

4 hours ago

सिंहस्थाचा श्रीगणेशा; विघ्नांचा मात्र ससेमिरा!

- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…

5 hours ago

पक्षांतर्गत शह-काटशह

- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…

5 hours ago

हृदगत गुरू : बाळासाहेब वाघ

तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…

5 hours ago

मी करीन ती पूर्व!

रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…

5 hours ago