हिंदू मुलींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे, त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवून त्याचे व्हिडीओ शूटिंग करायचे आणि त्याद्वारे तिला ब्लॅकमेल करायचे. निकाह करण्यासाठी तिचे बलपूर्वक धर्मांतर करायचे, तिच्याद्वारे अनेक मुले जन्माला घालायची, अशा पद्धतीचे ’लव्ह जिहाद’चे जाळे संपूर्ण भारतात पसरले आहे.
आजतागायत देशभरात अशा स्वरूपाच्या हजारो तक्रारी पोलीस ठाण्यात प्रविष्ट करण्यात आल्या आहेत. लाखो हिंदू मुली या षडयंत्राला बळी पडून आपले सर्वस्व गमावून बसल्या आहेत. ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंपासून, आयएएस ऑफिसर्स, डॉक्टर, वकील, अभिनेत्रीसुद्धा आहेत. लव्ह जिहादला बळी पडलेल्या मुलींना नंतर आखाती देशांमध्ये विकले जाते. त्यांचा आतंकवादी कारवायांसाठी वापर केला जातो किंवा त्यांच्या अवयवांची तस्करी केली जाते, असेही सप्रमाण सिद्ध झाले आहे. या सर्वांना विरोध करणार्या मुलींचे मृतदेह पुढे सुटकेसमध्ये, फ्रिजमध्ये, रस्त्यालगत सापडतात. अशी कितीतरी प्रकरणे महाराष्ट्रातही घडली आहेत. लव्ह जिहादची भयावहता दर्शवणारा दि केरला स्टोरी आणि त्याचा सिक्वेल असे दोन चित्रपट येऊन गेले. लव्ह जिहादला बळी पडलेल्या मुलींची आपबिती सांगणारे अनेक व्हिडीओ आज यूट्यूबवर उपलब्ध आहेत. लव्ह जिहादचा धोका ओळखून उत्तर प्रदेश सरकारने सर्वप्रथम राज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा करून त्याद्वारे कारवाई सुरू केली. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्रातही बलपूर्वक धर्मांतरबंदी कायदा करण्यात आला. लव्ह जिहाद नावाच्या धर्मांध षडयंत्रामध्ये केवळ तरुण मुलेच नाहीत, तर मुलीही सहभागी असल्याचे दि केरला स्टोरी चित्रपटातून आपण पाहिले. आता त्याचा प्रत्यक्ष पुरावा समोर आला आहे.
उत्तर प्रदेशमधील शामली जिल्ह्यातील एका कोट्यधीश व्यावसायिकाला एका मुसलमान जिम ट्रेनरने प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याचे धर्मांतर केल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले आहे. शामली जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष देवराज मलिक हे जिल्ह्यातील एक नावाजलेले प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. त्यांचा एकुलता मुलगा आयुष मलिक याने बी. फार्मसीचे शिक्षण घेतले आणि तो स्वतःचे मेडिकल चालवत आहे. पाच वर्षांपूर्वी त्याने राहत्या ठिकाणाजवळील ’कुरेशी प्लस’ नावाच्या जिममध्ये जाण्यास सुरुवात केली. कोट्यधीश असलेल्या आयुषला तेथील जिम ट्रेनर चांदनी कुरेशी हिने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. चार वर्षांपूर्वी तिने छुप्या पद्धतीने त्याचे धर्मांतर करून रहेमान असे नाव ठेवले आणि त्याच्याशी निकाह केला. याबाबत आयुषच्या घरच्यांना काहीच कल्पना नव्हती. मागील सहा महिन्यांपासून आयुषच्या वागण्यात अचानक परिवर्तन जाणवू लागले. त्याने दाढी वाढवली, कुर्ता- पायजमा आणि डोक्यावर गोल टोपी घालून तो दुकानात बसू लागला इतकेच नव्हे, तर मशिदीत जाऊन दिवसातून पाच वेळा नमाज पढू लागला. यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर हिंदू संघटनांनी जिम ट्रेनर चांदनीी कुरेशीच्या घरासमोर निदर्शने केली. आयुषचे वडील देवराज मलिक यांनी शनिवारी रात्री शामली पोलीस ठाण्यात धाव घेऊन चांदनी कुरेशी आणि तिच्या कुटुंबाच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्याची दाखल घेत पोलिसांनी चांदनीी आणि तिच्या घरातील सहा सदस्य, तीन मौलवी यांच्या विरोधात जबरदस्तीने धर्मांतर करणे, खंडणी उकळणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे या गुन्ह्याखाली गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
ज्या भारतभूमीत पूर्वी सोन्याचा धूर निघत होता अशा समृद्ध आणि सुखसंपन्न भारतात यवनी आक्रमक आले आणि त्यांनी भारताचे सारे वैभव लुटले. येथील पुरातन मंदिरे पाडली, त्यावर मशिदी उभारल्या. येथील संस्कृतीच्या खुणा पुसल्या. तलवारीच्या बळावर धर्मांतरे घडवून आणली. बायाबापड्यांवर अत्याचार केले. त्यांना जनानखान्यात डांबले. येथील शूरवीर योद्ध्यांनी यवनी आक्रमकांचा कडाडून विरोध केला. पुढे आलेल्या इंग्रजांनीही भारताचे उरलेसुरले वैभव लुटले. घरादारावर तुळशीपत्र ठेवून आपल्या देशभक्त क्रांतिकारकांनी त्यांना भारत सोडण्यास भाग पाडले. सर्व प्रकारच्या पारतंत्र्यापासून भारत मुक्त झाला. मात्र, आपला धर्म वाढवण्याचे मनसुबे बाळगणारी धर्मांध पिलावळ आजसुद्धा या देशात वळवळते आहे. लव्ह जिहाद, थुंक जिहाद, लँड जिहाद, कॉर्पोरेट जिहाद यांसारखे अनेक जिहाद विविध क्षेत्रांत पाय रोवून बसले आहेत. मिळेल तिथे सावज शोधताहेत. हिंदूंचा वंशविच्छेद करण्यासाठी आणि आपला धर्म वाढवण्यासाठी त्यांनी लव्ह जिहादसारखे षडयंत्र आणले आहे, ज्याद्वारे भोळ्याभाबड्या हिंदू मुलींना जाळ्यात अडकवले जात आहे. पोटच्या मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपावे, तिला शिकवावे, तिचे सर्व हट्ट पुरवावेत आणि वयात आल्यावर तिच्यासाठी सुयोग्य वर शोधून तिचे कन्यादान करावे, अशी प्रत्येक आई-वडिलांची माफक इच्छा असते. अशी लाडाप्रेमाने वाढवलेली मुलगी कोणाच्या तरी फसव्या प्रलोभनांना फसते आणि आई-वडिलांना झुगारून धर्मपरिवर्तन करते हे कोणत्याही आई-वडिलांच्या काळजावर घाव करणारेच आहे. मुलीने स्वत:च्या मनाने निवडलेला जोडीदार तिला सुखाने नांदवणारा आहे, हे कळल्यावर पालकांचा राग उणावतोही. मात्र, आपली लाडकी मुलगी एका जिहादी संकटाला बळी पडली असून, तिच्या आयुष्याची पुरती फरपट झाल्याचे ऐकून त्या आईबापाचे हृदय किती पिळवटून निघत असेल याचा विचार कोणी केला आहे का? देशभरातील अशा लाखो मुली या षडयंत्राला बळी पडल्या आहेत.
माध्यमांसमोर येऊन आपली व्यथा मांडण्याचे धाडस सर्वांमध्ये नसते. त्यांपैकी काही निमूटपणे अन्याय सहन करतात, तर काही कुंटणखाना हेच आपले घर मानून प्रतिदिन मरणयातना सहन करतात. लव्ह जिहादच्या षडयंंत्रात आता धर्मांध मुलींचाही वापर केला जाऊ लागला आहे. महाविद्यालये,
कार्पोरेट ऑफिसेस यांसारख्या ठिकाणी आपले सावज शोधत असतात. श्रीमंत मुले यांचे प्राधान्य असते. याआधीही अशा प्रकारची प्रकरणे समोर आली आहेत. आज लव्ह जिहाद दारापर्यंत येऊन ठेपला आहे. उद्या तो आपल्या घरातही येऊ शकतो यासाठी प्रत्येक हिंदू मुलीनेच नव्हे, तर मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी सतर्क राहायला हवे!
Girls too are now active in ‘Love Jihad’
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…