शेतीसिंचन, पिण्याच्या पाण्याचा सुटणार प्रश्न
पळाशी : वार्ताहर
नांदगाव तालुक्यातील गिरणा धरणाचा जलसाठा हा शंभरीकडे वाटचाल करीत असून, सलग दोन वर्षे शंभर टक्के धरण भरणार असल्याने, सद्यस्थितीत 92 टक्क्यांच्यावर साठा गेला आहे. गिरणा धरणावर अवलंबून असलेले शेतीसिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने नागरिकांत आनंदाचे वातावरण आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, मालेगाव या तालुक्यांसह निम्मा जळगाव जिल्ह्याची शेतीसिंचनासह पिण्याच्या पाण्याची तहान भागवणार्या गिरणा धरण लवकरच शंभरी पार करेल. सद्यस्थितीत गिरणा धरणात नव्वद टक्क्यांच्या वर जलसाठा आहे. शेतीसिंचन व पिण्याच्या पाण्याचा बिकट प्रश्न सुटणार असल्याने नागरिकांत आनंदाचे वातावरण आहे.
मागील वर्षी गिरणा धरण दोन वर्षांनंतर ओव्हरफ्लो झाले होते.त्यानंतर सलग दोन वर्षे गिरणा धरण शंभरी गाठत असून, चौदाव्या वेळेस धरण भरत आहे. गतवर्षी दुष्काळाचे चटके गिरणालाही बसले होते. 56 टक्के जलसाठा मागच्या वर्षी शिल्लक होता. गिरणा धरणात फक्त मे महिन्यात केवळ 11 टक्के जलसाठा शिल्लक राहिला होता. गत वर्षी व यंदा मात्र गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे गिरणा धरण हे शंभर टक्के पूर्ण भरण्याच्या स्थितीत आहे. सद्यस्थितीत प्रकल्पातील जलसाठा हा नव्वद टक्क्यांच्या आसपास आहे. परिणामी, धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पाटबंधारे विभागाने धरण पात्रातून नागरिकांनी जाऊ नये, असे आवाहन केले आहे. धरणात पाणलोट क्षेत्रातील आवक कमी प्रमाणात चालू असून, कधीही धरण शंभर टक्के भरू शकते. गिरणा धरणाच्या सुरक्षिततेसाठी धरणातून विसर्ग होऊ शकतो. दरम्यान, नांदगाव तालुक्यात पावसाचा जोर कायम असून, माणिकपुंज धरण, मध्यम प्रकल्प, धरण या अगोदरच ओव्हरफ्लो झाले आहेत. तर नाग्यासाक्या धरण सत्तर टक्क्यांवर आहे. मन्याड मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो होऊन अगोदरच प्रवाहित झालेला आहे. नांदगाव तालुक्यात दोन-तीन दिवसांत दमदार पाऊस झाल्याने नद्या-नाले यांना पूर येऊन प्रवाहित झाले आहे.
सतर्कतेचा इशारा
आता गिरणा धरण हे सलग दोन वर्षे शंभरी गाठणार असून, आतापर्यंत चौदाव्यांदा शंभरी गाठणार आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, मालेगाव व गिरणा धरण परिसर, जळगाव जिल्ह्यातील शेती, सिंचन, बागायती शेती व दोन्ही जिल्ह्यांतील गिरणा धरणावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजना गिरणा धरणावर अवलंबून आहेत. निम्मा जळगाव जिल्ह्याची गिरणा धरणावर मदार आहे. धरण नवव्यांदा सन 2019मध्ये शंभर टक्के भरले होते. त्यानंतर 2020 ऑगस्टमध्ये दहाव्यांदा शंभरी गाठली होती. तर दहा वेळा नव्वद टक्क्यांवर गेले होते. आता गिरणा धरणाच्या जलसाठ्यात वाढ होऊन शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. गिरणा धरणात पाण्याची आवक सुरू राहिली तर शंभर टक्के भरेल. धरणाच्या सुरक्षिततेसाठी केव्हाही गिरणा धरणातून विसर्ग होऊ शकतो. नदीकाठच्या व नदीपात्रालगत असणार्या गावकरी यांनी दक्षता बाळगावी, असा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…