नाशिक

सोनपावलांनी गौराईंचे घरोघरी उत्साहात आगमन`

नाशिक : प्रतिनिधी
गणरायाच्या आगमनानंतर भाद्रपद शुद्ध षष्ठीला महालक्ष्मी गौरींचे काल (दि. 31) सोनपावलांनी आगमन झाले असून, घरोघरी भक्तिभावाने गौराईंचे स्वागत करण्यात आले. घराघरांत मंगलमय वातावरण पसरले असून, महिलावर्गात विशेष उत्साह पाहायला मिळत आहे.
गौराईंना आज (दि. 1 ) पुरणपोळी, सोळा भाज्या, वडे, खीर, कथिल, आंबिल, अळूवडी अशा विशेष नैवेद्यांचा महाप्रसाद मंत्रोच्चारात दाखविला जाणार आहे. महालक्ष्मींसाठी खास डांगराची फुले,
फुलांच्या माळा, गजरे, वेणी, खिरापत, फळे, विडा यांची आरास करून देवींची भव्य पूजा केली जाते. दोन्ही बाजूंनी कलश, धान्याच्या राशी व साडी-चोळीने ओटी भरली जाते. पौराणिक कथेनुसार, भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून श्री गौरीने पृथ्वीवर सुखशांती नांदवली. त्यानिमित्त अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया हे व्रत करतात. तीन दिवस चालणार्‍या या पूजेत षष्ठीला ज्येष्ठा गौरींचे आवाहन, सप्तमीला पूजन व नैवेद्य तर अष्टमीला विसर्जन करण्यात येते. नाशिकसह ग्रामीण भागातही विविध पद्धतींनी गौराईंची स्थापना होताना दिसत आहे. कुठे प्रतिमा, कुठे कागदावरील चित्र, कुठे नदीकाठचे खडे तर कुठे मडक्यांची उतरंड सजवून त्यावर मुखवटा बसवला जातो. काही ठिकाणी सुवासिक वनस्पती व तेरड्याच्या रोपांवर मातीचा मुखवटा चढवून गौराईंची स्थापना केली जाते. वर्षातून एकदाच होणार्‍या या आगमनासाठी घरातील महिला व कुटुंबीय परिश्रमपूर्वक तयारी करतात. तिसर्‍या दिवशी गौराईंना निरोप दिला जातो, त्यावेळी हळदीकुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यामुळे गौराईंचा उत्सव अधिकच मंगलमय होतो. उद्या गौराईंना निरोप दिला जाणार आहे.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

13 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

13 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

13 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

13 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

13 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

13 hours ago