यंदा पाऊस फारच कमी पडणार असल्याच्या अंदाजाने शेतकरीच नव्हे, तर आपल्या सर्वांची चिंता वाढली होती. उशिरा का होईना जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जोरदार पाऊस पडला. पाऊस आता थांबला असला, तरी त्याच पावसाने पेरण्यांना वेग आला आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने चिंतेत असलेल्या राज्यातील बळीराजासाठी जुलै महिन्याची सुरुवात दिलासादायक ठरली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जूनमधील पावसाची तूट काही प्रमाणात भरून निघाली असून, राज्यातील खरीप पेरण्यांच्या कामांना चांगलाच वेग आला आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने चिंतेत असलेल्या राज्यातील बळीराजासाठी जुलै महिन्याची सुरुवात दिलासादायक ठरली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जूनमधील पावसाची तूट काही प्रमाणात भरून निघाली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात वरुणराजाने सर्वांनाच हात दिला. कृषी विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत सरासरी खरीप क्षेत्राच्या 67 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. राज्याचे एकूण सरासरी खरीप क्षेत्र एक कोटी 44 लाख 36 हजार 54 हेक्टर असून, त्यांपैकी 96 लाख 20 हजार 671 हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी पूर्ण झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत 84 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती. यंदाचा हंगाम तुलनेने काहीसा संथगतीने पुढे जात असला, तरी तो जात आहे, हे महत्त्वाचे. यंदाच्या हंगामात शेतकर्यांचा कल प्रामुख्याने सोयाबीन, कापूस आणि मका या पिकांकडे असल्याचे दिसून येत आहे. सोयाबीनच्या सरासरी क्षेत्रापैकी 66 टक्के, तर कापसाच्या 71 टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. मक्याची यंदा सर्वाधिक पेरणी झाली आहे. सरासरी 9.33 लाख हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल 8.90 लाख हेक्टर, म्हणजेच 95 टक्के क्षेत्रावर मक्याची पेरणी पूर्ण झाली आहे. जून महिन्यात राज्यात 48 टक्के पावसाची तूट असल्याने पेरणीबाबत सुरुवातीला साशंकता निर्माण झाली होती. जुलै महिन्यात पावसाने राज्यभर दमदार हजेरी लावल्याने आता पेरण्यांचा वेग वाढला आहे. आगामी काळातही पावसाची साथ कायम राहिल्यास यंदाचा खरीप हंगाम समाधानकारक ठरेल. तसा पावसाचा ऑगस्ट महिना बाकी आहे. बोगस बियाण्यांमुळे पीक न उगवल्यास किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊन दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकर्यांना स्वखर्चाने बियाणे खरेदी करावे लागणार नाही. अशा बाधित शेतकर्यांना जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) निधीतून मोफत बी-बियाणे उपलब्ध करून दिले जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी दिली. बळीराजाला सरकारने दिलेला एक दिलासा आहे. राज्यातील धरणांमध्ये एकूण क्षमतेच्या 44 टक्के पाणीसाठा शिल्लक असून, हे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. राज्य मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आलेल्या जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार, 13 जुलैपर्यंत राज्यातील 3,029 धरणांमध्ये एकूण 632.89 टीएमसी (अब्ज घनफूट) पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षी याच तारखेला हा साठा 843.57 टीएमसी (59 टक्के) इतका होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा बराच कमी आहे. मात्र, 20 जून रोजी नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) सक्रिय झाल्यानंतर धरणांमधील साठ्यात 295.51 टीएमसीने वाढ झाली आहे. साठा कमी असला, तरी थोडाफार आहे. ऑगस्ट महिन्यात पाऊस झाला, तर तो वाढू शकतो. नाशिक महसूल विभागात सध्या सर्वाधिक पाणीसाठा आहे. नाशिक विभाग : 86 टक्के, छत्रपती संभाजीनगर विभाग : 66 टक्के, कोकण विभाग : 62 टक्के, पुणे विभाग : 51 टक्के, अमरावती विभाग : 42 टक्के, नागपूर विभाग : 40 टक्के याप्रमाणे साठा आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील मोठ्या धरणांमध्ये सध्या 48 टक्के उपयुक्त (श्रर्ळींश) पाणीसाठा आहे. मध्यम धरणांमध्ये 42 टक्के आणि लघू प्रकल्पांमध्ये अवघा 29 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. कोकण आणि गोव्यात सरासरीपेक्षा 6 टक्के अधिक पाऊस झाला असून, मध्य महाराष्ट्रातही 8 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील स्थिती अद्याप चिंताजनक असून, येणारा संपूर्ण आठवडा राज्यात बहुतांश ठिकाणी कोरडाच जाण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी स्थानिक हवामानातील बदलांमुळे हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. जुलैमध्ये जितका पाऊस पडला, तितका पडेल, असा काही अंदाज नव्हता किंवा अपेक्षा नव्हती. पण जो पडला त्याने नक्की हात दिला. दिलासा दिला, हेही नसे थोडके. आषाढी एकादशी झाल्यानंतर पाऊस पडेल, अशी अपेक्षा आहे.
‘पिंपळ’ या मराठी चित्रपटात,
देवाला काळजी रे…
देवाला काळजी!
तुझ्या येण्या-जाण्याची,
देवाला काळजी रे… देवाला काळजी!
असे एक गाणे आहे. वैभव जोशी यांनी रचलेल्या या गाण्याला नरेंद्र भिडे यांनी संगीत दिले असून, ते लोकगायक आनंद शिंदे यांनी गायिले आहे. हे गाणे जीवनाचे मर्म सांगणारे आहे. माणूस जेव्हा थकून जातो, हताश होतो, तेव्हा त्याला धीर देणारे हे गाणे आहे. देवाला काळजी रे… देवाला काळजी… या ओळी मनाला भिडतात. शेतकर्यांच्या मनाला भिडणारे हे गाणे नक्कीच आहे. यंदा पाऊस फारच कमी पडणार असल्याच्या अंदाजाने शेतकरीच नव्हे, तर आपल्या सर्वांची चिंता वाढली होती. उशिरा का होईना जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जोरदार पाऊस पडला. पाऊस आता थांबला असला, तरी याच पावसाने आता पेरण्यांना वेग आला आहे. देवाला काळजी असेल, तर पुढच्या महिन्यात आणखी पाऊस पडेल आणि पेरण्यांना वेग येईल. धरणसाठाही वाढेल. आशावादी राहू या!
God cares… God cares.