गोदेच्या पातळीत पुन्हा वाढ

संततधार : गंगापूरमधून विसर्ग सुरू
नाशिक : प्रतिनिधी
शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झाले आहे. गंगापूर धरणात पाणीसाठा वाढल्याने कालपासून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून, दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या वरपर्यंत पाणीपातळी पोहोचली आहे. दारणा धरण क्षेत्रातही पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने दारणामधूनही पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
पावसाने मागील दोन तीन दिवस उघडीप दिली होती. सर्वत्र कडक उन्हाळ्यासारखे ऊन पडले होते. मात्र, काल रात्रीपासून पुन्हा पावसाची संततधार सुरू झाली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाल्याने कालपासून गंगापूर धरणातून विसर्ग सुरू झाला आहे.गंगापूर धरणामध्ये यंदा लवकर पाणीसाठा वाढला आहे. सद्या गंगापूर धरणाचा साठा 65 टक्कयाच्या वर गेला आहे. जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठाही वाढला असून, पावसाची संततधार सुरुच आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून 3486 तर दारणातून 7515 क्सुसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरीला पुन्हा एकदा पूर आला आहे. गोदावरीच्या पातळीत वाढ होऊ लागताच नागरिक आणि या भागातील व्यावसायिक सतर्क झाले आहेत. प्रशासनानेही खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यास सुरूवात केली आहे.
नांदूरमध्यमेश्‍वरमधूनही विसर्ग
दारणा आणि गंगापूर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नांदूरमध्यमेश्‍वर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. या धरणातूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. नांदूरमध्यमेश्‍वर परिसरातील शेतीर गोदावरीला आलेल्या पुरामुळे पाण्यात गेली आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती!

भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती! मुंबईत दोन मोठे फ्लॅट, ठाण्यात दुकानांसह बरंच काही शहापूर  : साजिद…

1 hour ago

विवाह हा संस्कार

भारतीय परंपरेतील प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार आहे विवाह. हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळणच…

2 hours ago

श्रावण सफल व्हावा…

श्रावणमास सुरू होतो तसे निसर्गात आल्हाददायक बदल घडू लागतात. आभाळात पांढर्‍याशुभ्र पिंजलेल्या कापसाची नक्षी उमटू…

2 hours ago

एसी लोकलमध्ये प्रवाशाचा चक्क छत्री उघडून प्रवास

एसी लोकलमध्ये प्रवाशाचा चक्क छत्री उघडून प्रवास शहापूर : साजिद शेख लोकल ही मुंबईतल्या प्रवाशांची…

23 hours ago

सर्प विज्ञानाची गरज

ह्मलोकेषु ये सर्पा शेषनाग परोगमा:। नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीतो मम सर्वदा॥ ब्रह्मलोकामधील सर्व सर्पांचा राजा नागदेव…

1 day ago

आकर्षक राख्यांनी बाजारपेठ सजली

यंदा राख्यांना महागाईची वीण नाशिक : प्रतिनिधी बहीण-भावाच्या नात्याची वीण घट्ट करणारा रक्षाबंधन सण दहा…

1 day ago