उत्तर महाराष्ट्र

उद्धव साहेब आम्ही तुमच्या सोबतच : नाशिकच्या सेना पदाधिकाऱ्यांनी घेतली पक्षप्रमुखांची भेट

नाशिक : प्रतिनिधी
शिवसेनेत झालेल्या बंडामुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नुकतीच नाशिकमध्ये येत शिव संवाद मेळावा घेतला. यावेळी शिवसैनिकांचा जबरदस्त
प्रतिसाद मिळाला. दरम्यान रविवारी (दि. 24) बंडानंतर नाशिक आणि मालेगावच्या नगरसेवकांनी मुंबईत मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी नाशिकसह मालेगावच्या सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी साहेब आम्ही तुमच्या सोबत असल्याचे पक्ष प्रमुख उद्भव ठाकरे यांना सांगितले.
जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते, गटनेते विलास शिंदे, या नेत्यांसह सर्वच महत्वाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक उपस्थित होते.  या भेटीबद्दल विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते म्हणाले, नाशिकची शिवसेना एकसंघ आहे. प्रतिज्ञापत्र देण्याची आवश्यकता खरं तर नाही. मात्र कोर्टातली प्रक्रिया आहे म्हणून लिहून दिले आहे. आज मातोश्रीवर यायला मिळालं  याचा आनंद आहे. ज्यांना निवडून दिलं ते गेले मात्र ज्यांनी त्यांना निवडून दिलं ते शिवसैनिक जागेवरच आहेत. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत उद्धव ठाकरे यांची हीच खरी शिवसेना आहे. असं प्रतिज्ञापत्रात आम्ही लिहून दिलं. शिवाय आम्ही उद्धव ठाकरे यांना आमच्या शहरासाठी वेळ मागितला आहे. नाशिकचे सर्व नगरसेवक आणि इतर असे एकूण 39 नगसेवकांनी यावेळी मातोश्रीवर उपस्थित होते. सर्व नगरसेवकांचे प्रतिज्ञापत्र या वेळी लिहून घेण्यात आले. ज्यात झालेल्या सत्तांतरानंतर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी  शिवसंवाद यात्रा काढली आहे.  शिवसेनेचे अनेक आमदार शिंदे गटात सामील झाल्याने, त्यांच्या मतदारसंघातील दुसऱ्या फळीतील नेते आता सक्रीय होतांना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेमुळे दुसऱ्या फळीला बळ मिळत असून, या यात्रेतील उत्साह त्यानिमित्ताने पाहायला मिळत आहे.  ठिक-ठिकाणी शिवसंवाद यात्रेला होणारी गर्दी पाहता शिवसेना पुन्हा जोमाने उभा राहण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोलले जात आहे. आधी मालेगाव शहर आणि नांदगावच्या आमदार आणि नंतर खासदार हेमंत गोडसे यांनी बंड केल्यानं नाशिकच्या शिवसेनेत फूट पडलीय. यातून पक्ष सावरण्यासाठी नाशिक शहर आणि जिल्ह्य़ातील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी उद्धव ठाकरे यांनी मातोश्री बंगल्यावर चर्चा केली. त्यांच्याकडून शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याचं शपथपत्रही भरून घेण्यात आलं.
भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

17 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

17 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

17 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

17 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

17 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago