नाशिक बार असोसिएशन निवडणुकीत ११ अर्ज बाद

नाशिक : वार्ताहर

नाशिक बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी अर्जांची छाननी केल्यानंतर ११ उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत . उर्वरीत ५३ उमेदवारांची यादी तयार करण्यात आली आहे . येत्या दोन दिवसांत उमेदवारांना अर्ज माघारी घेण्याची मुदत राहणार आहे . निवडणुकीसाठी 64 उमेदवारांनीच अर्ज दाखल केले होते . दोन दिवस अर्जांची छाननी करण्यात आली . त्यात अकरा उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले . वैध अर्जांमध्येअध्यक्षपदासाठी अॅड . नितीन ठाकरे , ॲड . महेश आहेर , अॅड . दिलीप वनारसे व अॅड . अलका शेळके यांचे अर्ज वैध ठरले आहेत . तर उपाध्यक्षपदासाठी प्रकाश आहुजा , वैभव शेटे , सुरेश निफाडे , शरद गायधनी व बाळासाहेब आडके या वकिलांचे अर्ज वैध ठरले . तीन सदस्य जागांसाठी १७ अर्ज , महिला सदस्यपदासाठी पाच व सात वर्षांच्या आतील प्रॅक्टिस असलेल्या सदस्यपदासाठी दोन अर्ज वैध ठरले . सोमवारी ( दि . २५ ) उमेदवारांना अर्ज माघारी घेण्याची मुदत राहणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *