नाशिक

राज्यातील शासकीय रुग्णालयांना यापुढे ’स्टार रेटिंग’

एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, सुविधा केंद्राचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी आता राज्यातील शासकीय रुग्णालयांना ’स्टार रेटिंग’ दिले जाणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयांसह एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड आणि एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्राचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी करण्यात आला. आरोग्यविषयक माहितीचा केवळ साठा न करता त्याचा लोकहितासाठी वापर करत नागरिकांना अधिक दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
आरोग्य संस्थांच्या गुणवत्तावाढीसाठी सुरू करण्यात आलेली ’स्टार रेटिंग प्रणाली’ हा या सुधारणांमधील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. या प्रणालींतर्गत शासकीय रुग्णालयांमधील वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांची उपस्थिती, औषध पुरवठा, स्वच्छता, प्रयोगशाळा सेवा, प्रसूती व शस्त्रक्रियांची आकडेवारी आणि रुग्णांचे प्रत्यक्ष अभिप्राय अशा विविध निकषांवर संस्थांचे मूल्यमापन केले जाईल. यामुळे नागरिकांना घरबसल्या रुग्णालयातील उपलब्ध सेवांची सर्वसमावेशक माहिती मिळेल. तसेच, नागरिकांना केवळ सेवा दिली का, यापेक्षा ती खर्‍या अर्थाने मिळाली का, याची खात्री करणारी पारदर्शक व्यवस्था आणि तक्रार निवारण यंत्रणा जिल्हास्तरावर निर्माण होणार आहे. या धोरणात्मक कार्यक्रमाला राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी आणि आरोग्य विभागाचे सचिव ई. रवींद्रन हे वरिष्ठ अधिकारी आवर्जून उपस्थित होते.

 

Government hospitals in the state to get ‘star ratings’ henceforth.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

15 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

15 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

15 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

15 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

16 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

16 hours ago