मंत्री गिरीश महाजन : गोदावरी पूर परिस्थितीची पाहणी
नाशिक : प्रतिनिधी
गेल्या दोन ते तीन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरीला आलेल्या प्रचंड पुरामुळे नदीकाठचे शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गंगापूर धरणातून करण्यात येणार्या विसर्गामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. नदीकाठावरील अनेक व्यावसायिकांना याचा फटका बसला आहे. जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री व कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी सातपूर, कामटवाडे, आयटीआय सिग्नल, पंचवटी, रामकुंड परिसरात भेट देऊन पाहणी केली. राज्यात बहुतांश ठिकाणी ही परिस्थिती असून, अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने बाधित झालेल्या शेतकरी व नागरिकांना मदतीसाठी शासन तत्पर आहे. मदतकार्य सुरू आहे, असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
यावेळी आमदार अॅड. राहुल ढिकले, आ. प्रा. देवयानी फरांदे जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मंत्री महाजन यांनी पंचवटी भागातील परिस्थिती जाणून घेतली. याठिकाणी नदीचे पाणी शिरले असून, दुकानदारांचे नुकसान झाले आहे. पंचवटीतीलच होळकर पूल परिसरातदेखील मंत्री महाजन यांनी भेट देऊन गोदावरी पूरपातळीची पाहणी केली.
राज्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधारेचा जोर कायम असून, अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे, तर शहरी भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. राज्यातील बहुतांश धरणांत साठा धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचल्याने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरीसह अनेक उपनद्या तुडुंब भरून वाहत आहेत. नदीकाठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना मंत्री महाजन यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. काही भागांत विसर्गामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
मंत्री महाजन यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांशी संपर्क साधला. ज्या ठिकाणी नागरिक अडकले आहेत, तेथे प्राधान्याने बचावकार्य हाती घ्यावे. कोणत्याही भागात मदतीस विलंब होऊ नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत पोहोचवावी, अशीही सूचना त्यांनी केली.
मंत्रालयातून 24 तास लक्ष
मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभाग पूर्णक्षमतेने कार्यरत आहे. 24 तास परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाइन क्रमांक कार्यान्वित करण्यात आले आहेत. नागरिकांना या क्रमांकांचा उपयोग करून वेळेवर माहिती मिळवता यावी, यासाठी प्रशासन सज्ज आहे.
रामसेतूसाठी 25 कोटींची तरतूद
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यावेळी येणार्या भाविकांची संख्या लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टीने वस्त्रांंतरगृह पाडून दुसर्या ठिकाणी ते बांधण्यात येणार आहे. पंचवटी येथील रामसेतूसाठी 25 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. हा पूल नव्याने बांधण्यात येणार आहे, असे मंत्री महाजन यांनी सांगितले.
नागरिकांना आवाहन
पूरस्थिती लक्षात घेता नदीकाठी राहणार्या नागरिकांनी अनावश्यक धोका पत्करू नये, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, तसेच कोणत्याही धरण परिसरात किंवा धबधबे परिसरात पर्यटनासाठी जाऊ नये, पाण्यात जाण्याचे साहस करू नये, खूपच आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…