सिन्नर : प्रतिनिधी
इमारतीची ग्रामपंचायत प्रमाणे घरपट्टी लावून देण्याच्या मोबदल्यात 25 हजारांची लाच घेताना पाथरे ता. सिन्नर येथील ग्रामसेवकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले. नितीन सगाजी मेहेरखांब (42, रा. त्रिमूर्ती चौक, फ्लॅट नंबर 2, संगमनेर) असे लाच घेणार्या ग्रामसेवकाचे नाव आहे. तक्रारदार यांचे पाथरे खुर्द येथे गावठाण हद्दीत जुने घर आहे. त्यांनी घराचा काही भाग तोडून दोन मजली इमारत बांधली असून, गावठाणमधील इमारतीची नोंद करुन व इमारतीची ग्रामपंचायत प्रमाणे घरपट्टी ठरवून देण्याच्या मोबदल्यात ग्रामसेवकाने पन्नास हजारांची लाच मागीतली होती. त्याचा पहिला हफ्ता 25 हजार रुपये स्वीकारताना ग्रामसेवकाला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर- घारगे, पोलीस निरीक्षक साधना इंगळे, सचिन गोसावी,प्रफुल्ल माळी यांच्या पथकाने केली.
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…
वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…