नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी डोईफोडेंसह मिसाळ, नरसीकर यांची बदली



– रमेश मिसाळ हे नाशिकचे नवे पुरवठा अधिकारी…

नाशिक – (विशेष प्रतिनिधी)
महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी तसेच उपविभागीय पदाच्या १८ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघाले आहेत. यातील आठ उपजिल्हाधिकारी यांना ‘वेटींग’ वर ठेवण्यात आले असून त्यांच्या नियुक्तीचे स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहेत.
राज्याचे उपसचिव माधव वीर यांनी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर येथील महसूल विभागातील उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये नाशिकचे पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांची अहमदनगरला पुनर्वसन विभागात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी धुळ्याचे पुनर्वसन अधिकारी रमेश मिसाळ हे आता नाशिकचे नवे पुरवठा अधिकारी असणार आहे. जयश्री माळी या अहमदनगर येथून जळगाव येथे भूसंपादन अधिकारी या पदावर जात आहेत. किरण पाटील यांची जळगाव वरून श्रीरामपूरला उपविभागीय अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. निफाड येथील उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी हेमांगी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जळगावचे
निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांची अहमदनगरला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जितेंद्र पाटील भुसावळ येथे उपविभागीय अधिकारी या पदावर, अंमळनेरच्या उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे नाशिकला भूसंपादन विभागात, जळगावचे भूसंपादन अधिकारी राजेंद्र वाघ हे नाशिकला निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून, धुळ्याचे उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड हे जळगावला पुरवठा अधिकारी म्हणून, महेश शेलार हे नंदुरबार वरून धुळ्याला पुरवठा अधिकारी म्हणून, नितीन गवंडे यांची धुळ्याला पुनर्वसन अधिकारी म्हणून बदली होत आहे. वासंती माळी यांची नाशिकला बदली झाली असून नफा विभागातून वनजमीन या विभागामध्ये त्यांची बदली करण्यात आली आहे. अहमदनगर, नंदुरबार येथील शाहूराज मोरे यांची बदली अहमदनगर येथे करण्यात आली आहे. नाशिकचे उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उर्मिला पटेल, अनिल पवार, गणेश मिसाळ, अर्चना पठारे, सुनील सूर्यवंशी, गोविंद दणजे आणि पल्लवी निर्मळ या उपजिल्हाधिकाऱ्यांना कोणतीही नियुक्ती देण्यात आलेली नाही. त्यांना प्रतीक्षेच्या यादीमध्ये ठेवण्यात आला आहे. त्यांच्या नियुक्ती बाबतचा निर्णय हा नंतर घेण्यात येणार असल्याचे आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

19 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

20 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

20 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

20 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

20 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

20 hours ago