नाशिकच्या जीएसटी अधिकार्‍यास 40 हजाराची लाच घेताना पकडले

नाशिकच्या जीएसटी अधिकार्‍यास
40 हजाराची लाच घेताना पकडले
नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात लाचखोरांचे प्रमाण वाढतच चालले असून, अभोणा येथे सहायक पोलीस निरीक्षक आणि एका हवालदाराला रंगेहाथ पकडल्यानंतर पाथर्डी फाटा येथील कार्यालयातील अधिकार्‍यास चाळीस हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. जगदिश सुधाकर पाटील (39) असे या अधिकार्‍याचे नाव आहे. तक्रारदारांचा जाहीरात चित्रीकरणाचा व्यवसाय आहे. जाहीरात चित्रीकरणाच्या कामात व्यत्यय येऊनतक्रारदार यांचे पाच ते सहा लाखांचे नुकसान होऊ नयेे यासाठी चित्रीकरणासाठी आलेले वाहने जीएसटीचा दंड न भरता सोडून देण्याच्या मोबदल्यात जगदिश पाटील यांनी चाळीस हजारांची लाच मागीतली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला. रक्कम स्वीकारताच पथकाने पाटील यांना रंगेहाथ पकडले. पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील, पोलीस नाइक प्रभाकर गवळी, संदीप हांडगे, प्रकाश महाजन यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, नरेद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
आतापर्यंत 100 च्यावर सापळे
नाशिक विभागात आतापर्यंत शंभराहून अधिक 125 च्या आसपास लाचखोरीची कारवाई झाली आहे. जिल्हा उपनिबंधक, शिक्षणाधिकारी, तहसीलदार असे बडे मासे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गळाला लागले आहेत. दररोज किमान एक कारवाई होत असली तरी लाचखोरीचे प्रमाण तसूभरही कमी झालेले नाही.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

12 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

12 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

12 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

12 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

12 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

12 hours ago