नाशिक

गुरुदक्षिणा ज्ञानाची; 700 माजी विद्यार्थ्यांकडून नवले यांची ‘ग्रंथतुला’

नायगावच्या जनता विद्यालयात रंगला सहस्रचंद्रदर्शन सोहळा; 42 सेवानिवृत्त शिक्षकांची उपस्थिती

सिन्नर : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देणार्‍या गुरूंप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेकदा सोहळे होतात, मात्र सिन्नर तालुक्यातील नायगाव येथे गुरू-शिष्य नात्याचा एक अनोखा आणि प्रेरणादायी अध्याय लिहिला गेला. जनता विद्यालयाचे निवृत्त शिक्षक अशोकराव गंगाधर नवले यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त (सहस्रचंद्रदर्शन) आयोजित कार्यक्रमात चक्क त्यांची ग्रंथतुला करण्यात आली. या ग्रंथतुलेतून जमा झालेला ज्ञानाचा ठेवा ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षार्थींसाठी खुला होणार असल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर भास्कर होते. कार्यक्रमाची सुरुवात जुना बसस्टॉपपासून सवाद्य मिरवणुकीने झाली. लेझीम आणि झांज पथकाच्या निनादात निघालेल्या या मिरवणुकीत गावकरी आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अनेक वर्षांनंतर आपल्या लाडक्या शिक्षकांना भेटण्यासाठी 1975 ते 2005 या 30 वर्षांच्या कालखंडातील तब्बल 700 हून अधिक माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी एकत्र आले होते.
व्यासपीठावर जुन्या बॅचचे विद्यार्थी जेव्हा मनोगत व्यक्त करण्यासाठी उभे राहिले, तेव्हा अनेकांचा कंठ दाटून आला. सरांच्या छडीने शिस्त लावली आणि त्यांच्या शब्दांनी आयुष्य घडवलं, अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

Gurudakshina is knowledge; 700 alumni read Navale’s ‘Granthatula’

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

3 hours ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

3 hours ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

3 hours ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

3 hours ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

3 hours ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

4 hours ago