जिल्हाध्यक्ष स्वाती मगर यांचा आक्रमक पवित्रा
मनमाड : प्रतिनिधी
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाढत्या अतिक्रमणामुळे स्थानिकांना आणि वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर, मनसे जिल्हाध्यक्ष स्वाती मगर यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. हे अतिक्रमण न हटल्यास मनसे स्टाइलने कारवाई करेल, असा सज्जड इशारा त्यांनी दिला आहे.
या ठिकाणी सायंकाळी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात येते. खाद्यपदार्थ आणि इतर दुकाने लागतात. सायंकाळी स्थानिकांना चालायलादेखील जागा राहत नाही. यामुळे येत्या आठ दिवसांत हे अतिक्रमण काढावे, अन्यथा मनसे स्टाइल अतिक्रमण काढण्यात येईल, असा इशारा स्वाती मगर यांनी दिला. अतिक्रमणाबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासन त्याकडे डोळेझाक करत आहे. त्यामुळे आता मनसेने पुढाकार घेतला असून, त्यांनी प्रशासनाला आठ दिवसांची मुदत दिली आहे. जर या कालावधीत अनधिकृत गाड्या आणि स्टॉल हटवले नाहीत तर होणार्या परिणामांना प्रशासन जबाबदार असेल, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. याशिवाय, जर हे काढले नाही तर मनसे स्टाइलने आंदोलन करू, असेही मगर यांनी पत्रात म्हटले आहे.
‘MNS style’ action if encroachments are not removed
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…