संपादकीय

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले

एकोणिसाव्या शतकातील सामाजिक रूढी-परंपरा, स्त्रियांना व शूद्रांना दिलेली पशुसमान वागणूक, चूल व मूल यात अडकून पडलेल्या स्त्रिया, जातीय व्यवस्था व जटिल रूढी -परंपरेत अडकलेला समाज, गळ्यात गाडगे व कमरेला खराटा बांधून गाडग्यात थुंकणे व खराट्याने पायाचे ठसे पुसणे यासारखा अनन्वित छळ असणारी समाजारचना अस्तित्वात असतानाच इसवी सन 1818 मध्ये इंग्रजांनी पुण्याच्या शनिवार वाड्यावरील भगवा उतरवून युनियन जॅक फडकवला. इंग्रज सत्तेवर शिक्कामोर्तब करून 1835 मध्ये लॉर्ड मेकॉलेने हिंदुस्थानात इंग्रजी शिक्षणपद्धती आणली.
या शिक्षणपद्धतीतून फुले दाम्पत्य, गोपाळ गणेश आगरकर, लोकहितवादी, पंडिता रमाबाई यांना स्त्री-पुरुष समानता, व्यक्तिस्वातंत्र्य, जीवनमूल्यांचे व शिक्षणाचे विचार पटू लागले. दरम्यानच्या काळात विद्येचे महानायक महात्मा जोेतिराव फुले यांनी जाणले की, विद्या परम दैवतम्। विद्या म्हणजे शक्ती, चैतन्य, ऊर्जा, प्रेरणा व सर्वांगीण विकासाचे प्रवेशद्वार आहे. हे लक्षात घेऊन शिक्षणाचे प्रभावी शस्त्र आपण जर स्त्रीरूपी आईच्या हाती दिले तर ते कार्य प्रभावी ठरवू शकेल. कारण असे म्हटले जाते, जिच्या हाती पाळण्याची दोरी, तीच जगाते उधारी! आईची योग्यता फार मोठी आहे. प्रत्येक राष्ट्रपुरुष प्रथम आईच्या तालमीत तयार होत असतो. राष्ट्रपुरुष व समाजधुरीणांच्या मालिकेतील एक मोठं नाव महात्मा जोतिराव फुले होय. महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी गोविंदराव व चिमणाबाई यांच्या पोटी झाला. आई चिमणाबाई लहानपणीच मरण पावल्याने आत्या सगुणाबाई क्षीरसागर यांनी जोेतिरावांना उत्तम संस्कारांची बाळगुटी देऊन सुसंस्कारित केले. सन 1833 मध्ये जोेतिरावांना चर्च ऑफ स्कॉटलंड या मिशनरी शाळेत प्रवेश मिळाला.
जोतिरावांंनी मानवता धर्माचा पुरस्कार करणार्‍या थॉमस पेन या लेखकाच्या ’राइट्स ऑफ मॅन’ पुस्तकातील जग हाच माझा देश आहे व सर्वांचे भले करणे, हाच माझा धर्म आहे. स्वातंत्र्य, समता व बंधुता ही जीवनमूल्ये अभ्यासली व पुढे 13 वर्षांचा जोतिराव व 9 वर्षांच्या सावित्री यांचा बालविवाह नायगाव येथे झाला. त्यावेळी बालविवाह करण्याची प्रथा होती. लग्नानंतर जोतिरावांनी सावित्रीबाईंना शिकविले. मुली शिकल्या पाहिजेत, पण मुलींसाठी शाळा नाही म्हणून 14 जानेवारी 1848 रोजी जोतिराव व सावित्रीबाईंनी पुण्यात भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. या शाळेत मुलींना शिकविण्याची जबाबदारी स्वतः सावित्रीबाई व सगुणाबाई यांनी उचलली. सबंध हिंदुस्थानातील पहिली शाळा. या शाळेच्या पहिल्या स्त्री शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका व पहिल्या शिक्षणतज्ज्ञ सावित्रीबाई फुले होत्या. पुढे 1848 च्या ऑगस्ट महिन्यात दलित, मुस्लिम मुलींसाठी शाळा काढली. लगेच पुढे 15 मे 1848 ला पुण्याच्या महारवाड्यात मुला-मुलींसाठी शाळा सुरू केल्याने शाळेत विद्यार्थी शिक्षण घेऊ लागले. शिक्षणाच्या कार्याला गती मिळाली. पुढील युवा पिढी घडवणारे शिक्षक प्रशिक्षित असावेत यासाठी स्वतःच जोतिरावांनी एक अध्यापक विद्यालय (नॉर्मल स्कूल) सुरू केले. शिक्षणप्रेमी तात्या भिडे यांनी पुण्यातील आपली जागा व सोबत 101 रुपयांची देणगी दिली. सावित्रीबाईंनी बिनपगारी शिकविण्याचे महान कार्य केले. पुढे शिक्षणाचे कार्य सासवड, नायगाव, शिरवळ, शिरापूर आदी गावी शाळा उघडून शिक्षणाच्या कार्याला गती दिली. अखेर 25 मुलींचा प्रवेश. यात दहा ब्राह्मण, सहा मराठा, दोन चांभार, दोन महार, एक मांग, एक धनगर, एक कोळी, एक साळी, एक माळी, अशा सर्व जातीधमीर्र्यांची मुले गुण्यागोविंदाने शिक्षण घेऊ लागली. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात क्रांतिकारी पाऊल टाकत असताना ही कल्पना काही कर्मठ लोकांना पसंत नसल्याने त्यांनी सावित्रीबाईंना धमकावले. त्यांच्या अंगावर शेण, माती व खरकटे पाणी फेकले जात असे. तरी सर्व त्रास सहन करत ही माता आपल्या ध्येयापासून तसूभरही डगमगल्या नाहीत.
कारण जोतिरावांंची खंबीर साथ होती. जणू काही शिक्षण फक्त उच्चवर्णीयांचीच मक्तेदारी होती. इतरांनी शिक्षण घेतलं तर त्यांच्या सात पिढ्या नरकात जातील, पुत्रप्राप्ती होणार नाही, स्त्रिया शिक्षणाने विधवा होतील. तसेच बायामाणसांनी अक्षरे वाचली तरी त्या अक्षरांच्या अळ्या बनून घरच्या पुरुषांच्या ताटात जातील, अशा वेडगळ कल्पना समाजमनात निर्माण केल्या जात होत्या. ही कार्यकारणमीमांसा आजच्या पिढीला न पटणारी आहे. मात्र, वास्तव आहे. खुद्द जोेतिरावांचे वडील गोविंदराव त्यातून सुटू शकले नाहीत. जोतिरावांच्या वडिलांनी जोतिरावांना ’समाजकार्य तरी सोडा नाही तर घर तरी सोडा’ असा निर्वाणीचा इशारा द्यावा
इतकी समाजरचना बुरसटलेली होती. असं म्हटलं जातं, की स्त्री व पुरुष ही एकाच रथाची दोन चाके आहेत. सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक कार्यास महात्मा जोतिराव फुले यांची प्रेरणा होती. सावित्रीबाई व महात्मा फुले यांनी सामाजिक व शैक्षणिक कार्य एकमेकांच्या साथीने उभे केले, ज्यामध्ये 1) 1848 मध्ये पुण्यातील भिडे वाड्यातील मुलींसाठी पहिली शाळा. 2) 15 मे 1848 रोजी महारवाड्यात मुला-मुलींसाठीची शाळा सुरू केली. 3) 1848 ते 52 या कालखंडात पुणे व परिसरातील 20 शाळा काढल्या व उत्तमरीत्या चालवल्या. 4) 28 जानेवारी 1853 रोजी पुण्यात बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना व व्यवस्थापनाचे कार्य. 5) 4 फेब्रुवारी 1889 ला मुलगा यशवंत याचा विवाह घडवून आणणे. 6) केशवपनाच्या चालीविरुद्ध नाभिकांंचा संप घडवून आणणे. 7) विधवा पुनर्विवाह घडवून आणणारी सभा स्थापन करणे. 8) शाळांसाठी योग्य अभ्यासक्रम तयार करणे. 9) प्रौढ शिक्षण व रात्रीची शाळा चालविणे. 10) सतीची चाल बंद करण्याचा प्रयत्न. 11) अस्पृश्यांसाठी घरचा पाण्याचा हौद खुला करणे. 12) 28 जानेवारी 1853 रोजी पुण्यात बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केल्यानंतर या गृहाची व्यवस्था सावित्रीबाई स्वतः बघत. सावित्रीबाईंनी जीवनाच्या रंगमंचावर नानाविध भूमिका साकारल्या.त्यात प्रथम स्त्री शिक्षिका, प्रथम मुख्याध्यापिका, समाजसुधारक, तसेच मराठीतील आद्य कवयित्री.सावित्रीबाई या उत्तम लेखिका व कवयित्री होत्या. त्यांच्या काव्य फुले- सामाजिक कविता (1854), बावनकशी सुबोध रत्नाकर (1892). ही त्यांची निवडक साहित्य रचना. बावनकशी सुबोेध रत्नाकर काव्यसंग्रहात जोतिरावांंचे मोठेपण मांडताना त्या म्हणतात,
जयाचे मुळे मी कविता रचिते ।
जयाचे कृपे ब्रह्म आनंद चित्ते ॥
जयाने दिली बुद्धीही सावित्रीला ।

Gyanjyoti Savitribai Phule

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

18 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

18 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

19 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

19 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

19 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

19 hours ago