लासलगाव : समीर पठाण
लासलगाव येथील भाभा अणुसंशोधन केंद्र कृषक विकिरण केंद्रातून यंदा प्रथमच चवदार हापूस आंब्याने थेट अमेरिकेतील न्यूयॉर्ककडे परदेशवारी केली आहे. मंगळवारी (दि. 7 एप्रिल) 1100 बॉक्समधील सुमारे चार टन हापूस व केशर आंबा विकिरण प्रक्रिया पूर्ण करून रवाना करण्यात आला, अशी माहिती प्रकल्प अधिकारी संजय आहेर यांनी दिली.
अमेरिकेच्या मान्यतेसाठी आवश्यक तपासणी प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून, अमेरिकेकडून आलेल्या दोन वरिष्ठ अधिकार्यांनी लासलगाव केंद्राची पाहणी करून निर्यातीसाठी आवश्यक प्रमाणपत्र दिले. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
लासलगाव येथील या केंद्रात 2002 ते 2006 दरम्यान केवळ कांद्याचे विकिरण केले जात होते. 2007 पासून आंब्यावरही प्रक्रिया सुरू झाली. सुरुवातीला BARC व पणन मंडळाकडे असलेला हा प्रकल्प नंतर खासगी क्षेत्रात गेला असून, सध्या हिंदुस्थान अॅग्रो लिमिटेड कंपनी हा प्रकल्प चालवत आहे. मागील वर्षी आवश्यक प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्याने निर्यात ठप्प झाली होती.
यंदा कोकणातील हापूस व गुजरातमधील केशर आंबा लासलगाव येथे आणून गॅमा किरणांच्या सहाय्याने विकिरण करण्यात आले. या प्रक्रियेमुळे आंबा अधिक काळ टिकतो, कोयीतील कीड नष्ट होते, तसेच चव व ताजेपणा अबाधित राहतो.
लासलगाव केंद्रातून पुढील काही दिवसांत अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया व मलेशिया या देशांकडेही आंब्याची निर्यात होणार आहे. दरवर्षी भारतातून सुमारे 50 हजार टन आंब्याची निर्यात होते. त्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. यंदा 31 जूनपर्यंत सुमारे तीन हजार टन आंबा निर्यात होण्याचा अंदाज आहे.
हापूस (अल्फान्सो), केशर, बदाम, राजापूर, मल्लिका, हिमायत, दशहरा, लंगडा, चौसा अशा विविध जातींना परदेशात मोठी मागणी आहे. लासलगाव विकिरण केंद्रामुळे निर्यातीला नवे बळ मिळत आहे. परिणामी शेतकर्यांसाठी हा महत्त्वाचा उत्पन्नाचा स्रोत ठरत आहे. यंदाच्या हंगामात सुरुवातीलाच निर्यात सुरू झाल्याने आंबा उत्पादकांना चांगल्या दराची अपेक्षा व्यक्त होत आहे.
लासलगाव केंद्रातून आंबा निर्यातीचा आढावा (टनात)
2007 – 157 2017 – 600
2008 – 275 2018 – 580
2009 – 122 2019 – 685
2010 – 96 2020 – कोरोना काळ
2011 – 85 2021 – कोरोना काळ
2012 – 210 2022 – 360
2013 – 275 2023 – 1000
2014 – 328 2024 – 1100
2015 – 328 2025 – निर्यात नाही
2016 – 560
Hapus’ journey from Lasalgaon to ‘America’
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…