आमची गाडीच नाही तर गणपतीही चोरला ? 27 वर्षाची परंपरा खंडीत , यंदा गोदावरीचा राजा गणेशोत्सव रद्द..!
मनमाड : आमिन शेख
गेल्या 27 वर्षापासून मनमाड ते मुंबई सुरू असलेली गोदावरी एक्सप्रेस मधील गोदावरीच्या राजाची वारी यंदा खंडित पडली असून रेल्वे प्रशासनाने मनमाड वरून सुटणारी गोदावरी एक्सप्रेस धुळे येथून सुरू केल्याने प्रवाशांसह 27 वर्षापासून परंपरा जपणाऱ्या भाविकांचे देखील यंदा हाल झाले आहे यंदा गोदावरीचा राजाला गणेशोत्सव साजरा करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने परवानगी नाकारल्याने यावर्षी गोदावरीच्या राज्याची स्थापना होणार नसल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली असून राजकारणी व रेल्वे प्रशासनाने आमची गाडीच नाही तर गणपतीही चोरला गणराया आम्हाला माफ करा अशी भावनिक साद घातली आहे.
मनमाड ते मुंबई धावणारी गोदावरी एक्सप्रेस धुळ्याचे तत्कालीन खासदार सुभाष भामरे यांनी व रेल्वे प्रशासनाने मनमाड येथून बंद करून धुळे इथून सुरु केली ही गाडी केवळ गाडी नव्हती तर मनमाड येवला निफाड लासलगाव नाशिक नांदगाव चांदवड या तालुक्यातील जनतेची जीवनवाहिनी म्हणून प्रसिद्ध होती या गाडीसोबत अनेकांचे जिव्हाळ्याचे नाते होते यासह सर्व धर्मीयांच्या धार्मिक भावना देखील या गाडीसोबत जोडल्या गेल्या होत्या गेल्या 27 वर्षापासून प्रवाशांसोबत गोदावरीचा राजा अर्थात दहा दिवस गणपती देखील मनमाड ते मुंबई प्रवास करायची या दहा दिवसाची रोज अपडाऊन करणाऱ्यांसह इतर प्रवाशांना देखील आतुरता असायची गेल्या 27 वर्षापासून ही परंपरा कायम होती मात्र यंदा रेल्वे प्रशासनाने गोदावरीच्या राजाचा उत्सव साजरा करण्यासाठी परवानगी नाकारली यामुळे ही परंपरा 27 वर्षांनंतर खंडित झाली असुन यामुळे रोज अपडाऊन करणाऱ्या चाकरमानी यांच्यासह इतर प्रवासी वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे.बाप्पा आम्हाला माफ करा मनमाड रेल्वे प्रबंधक आणि रेल्वे प्रशासन तसेच लोकप्रतिनिधीच्या राजकारणामुळे यंदा आम्ही तुमची सेवा करू शकणार नाही आम्हाला माफ कर आणि या लोकांना ही गाडी पुन्हा सुरू करण्याची बुद्धी दे आशी भावनिक पोस्ट गोदावरीचा राजा बहुउद्देशिय चॅरिटेबल संस्थेच्या वतीने व्हायरल करण्यात आली आहे.
–
गोदावरी एक्सप्रेस सुरु करण्याची सद्बुद्धी दे…!
रेल्वे प्रशासनाने तसेच लोकप्रतिनिधी यांच्यामुळे आमची मनमाड शहरासह ग्रामिण भागातील चाकरमानी यांच्या सह प्रवासी वर्गाची गाडी चोरीला गेली यावर्षी तर आमचा गणेशोत्सवही चोरीला गेला आहे मात्र आम्ही गणरायाकडे एकच प्रार्थना करतो की आमची गोदावरी एक्सप्रेस पळवणाऱ्या नेत्यासह रेल्वे प्रशासनाला सद्बुद्धी मिळो व आमची गोदावरी एक्सप्रेस लवकरात लवकर सुरू व्हावी हीच इच्छा..
नरेंद्र खैरे,प्रवासी संघटना प्रतिनिधी