बोराळे फाटा येथे तवेराची दुचाकीला
धडक तीन युवकांचा दुर्दैवी मृत्यू
दिंडोरी : अशोक केंग
निफाड तालुक्यातील कारसुळ येथे जाणाऱ्या दुचाकीला अनियंत्रित तवेराने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघे ठार झाले असुन शुक्रवारी रात्री साडे नऊवाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहीती अशी ,मंगेश रमेश हिलीम वय 23 ,विजय रमेश हिलीम वय 16, गौरव तुकाराम पवार वय 20 सर्व राहणार कारसुळ तालुका निफाडा असे तिघे युवक MH 15 BA – 2529 या क्रमांकाच्या दुचाकीवरुन वणी येथुन कारसुळ येथे शुक्रवारी रात्री चे सुमारास जात असताना पाठी माघून भरधाव वेगात MH 19 -AP – 9933 या क्रमांकाची तवेरा कार भरधाव वेगात आली व या कारने पुढे जात असलेल्या दुचाकीला जबर धडक दिली झालेल्या या भिषण अपघातात नमुद तिघे कारसुळ येथील तीनही युवक ठार झाले,अपघाताची माहीती मिळताच परीसरातील नागरीक ,रस्त्यावरील वाहनचालक व पोलिस घटनास्थाळी पोहचले तो पर्यंत अपघात करुन तवेरा कारचालक जखमीना वैद्माकीय उपचारासाठी मदत न करता घटनास्थळावरुन फरार झाला होता.दरम्यान या युवकांना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासाणी अंती मृत घोषित केले.दराम्यान तवेरा कारचालक याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, शरद माधव पवार रा कारसुळ यांनी याबाबत तक्रार दिली आहे.