जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या
दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला
शहापूर: साजिद शेख
दोन अल्पवयीन मुलींच्या विनयभंग प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीची जामिनावर सुटका होताच त्याने थेट पीडितांच्या घरासमोर ढोलताशांचा गजर, फटाके वाजवत मिरवणूक काढून पुन्हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे यात त्याच्या समर्थकांचाही समावेश आहे. या प्रकारानंतर उल्हासनगरच्या रमाबाई टेकडी परिसरात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात आरोपीसह त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एप्रिल महिन्यात २७ तारखेला मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास काही तरूणांनी एका घराचा दरवाजा ठोठावून जबरदस्ती आत घुसण्याचा प्रयत्न केला होता. दरवाजा उघडताच त्यांनी घरातील एका तरुणाला बेदम मारहाण केली. दुसऱ्याच दिवशी पुन्हा त्याच तरूणाने, त्याचा भाऊ रोहित झा आणि सोनमनी झा हे तिघे धारदार शस्त्र घेऊन पुन्हा त्या कुटुंबाच्या घरात घुसले होते. त्यावेळी घरात असणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना जबरदस्तीने घराबाहेर खेचून त्यांचा विनयभंग केला होता, अशी माहिती पीडितांनी पोलिसांना दिली . आरडाओरड ऐकून शेजारी बाहेर आले आणि त्यांनी आरोपींना पकडून जोरदार चोप दिला होता. या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आणि पोलिसांनी आरोपींना अटक केली होती.यातील एक आरोपी रोहित झा हा दोन दिवसांपूर्वी जामीन मिळाल्याने कारागृहाबाहेर आला. कल्याणच्या आधारवाडी कारागृहातून बाहेर पडल्यावर थेट उल्हासनगरच्या रमाबाई टेकडी परिसरात आला. त्याच्या समर्थकांनी ढोल-ताशे, फटाके वाजवत पीडितांच्या घरासमोरून त्याची मिरवणूक काढली. दहशत निर्माण करण्यासाठी केल्या गेलेल्या या प्रकारावर परिसरात संताप व्यक्त होत होता. नागरिकांमधून या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली जात होती. तसेच मुली आणि कुटुंबियांना संरक्षण देण्याची मागणीही पोलिसांकडे केली जात होती. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी आरोपी रोहीत झा, आशिष झा, अब्दुल खान, आरिफ सैय्यद यांच्यासह नऊ जणांवर दहशत निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या काही महिन्यात परिमंडळ चारमध्ये हत्या, गोळीबार, घरफोडी आणि दहशत माजवण्याचे अनेक प्रसंग समोर आले आहेत. त्यामुळे पोलिसांचा धाक उरला आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतो आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी झालेल्या या प्रकारामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांनी कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले आहेत. यांच्यावर वेळीच कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होते आहे.
ऑनलाइन गेमच्या व्यसनापायी वैद्यकीय शिक्षण सोडून बनला चोर शहापूर: साजिद शेख ऑनलाईन मोबाइल गेमच्या आहारी…
नांदगावच्या कन्या विद्यालयात कूकर फुटला शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या दोन महिला जखमी नांदगाव: प्रतिनिधी -…
मनमाड: प्रतिनिधी मागील काही दिवसांपूर्वी मनमाड शहरातील सिकंदर नगर भागातील पाच वर्षीय मुलाचे अपहरण करण्याचा…
राज्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हनी ट्रॅप केंद्रबिंदू या शहरात शहापूर/ साजिद शेख गेल्याकाही दिवसांपासून विधीमंडळात एक-…
जव्हार( राजेवाडी )येथे गॅस्ट्रो साथीचे थैमान: दोन रुग्णांचा मृत्यू, 14 रुग्णांवर उपचार सुरू मोखाडा: …
आधी प्रेम... मग लिव्ह इन अन नंतर ... शहापूर/साजिद शेख २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला अश्लील…