नाशिक : वार्ताहर
पकड वॉरंटमध्ये सहकार्य करण्याच्या मोबदल्यात ओझर पोलीस ठाण्याचे 52 वर्षीय पोलीस हवालदार कारभारी भिला यादव यांना सीतागुफा परिसर पंचवटीत परिसरात दोन हजारांची लाच घेताना रंगेहाथ
पकडण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, ओझर पोलीस ठाण्याचे हवालदार कारभारी भिला यादव (वय 52 वर्षे, पोलीस हवालदार 1255, नेमणूक – ओझर पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण. रा.पाथर्डी फाटा, ओम शांती को.ऑप. सोसा., नरहरीनगर, नाशिक) यांनी न्यायालयात दाखल असलेल्या कलम 138 चेक बाउन्सच्या केसमध्ये तक्रारदार यांच्याविरुद्ध न्यायालयाने काढलेल्या पकड वॉरंटमध्ये त्यास न्यायालयात हजर करण्यासाठी तसेच त्यांच्याविरुद्ध असलेल्या पकड वॉरंटमध्ये जमीनदार यांचे कागदपत्र घेऊन, पकड वॉरंटमध्ये सहकार्य करण्याच्या मोबदल्यात 2 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. ही लाच स्वीकारताना पोलीस हवालदार कारभारी भिला यादव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने
रंगेहाथ पकडले.
अँटी करप्शन ब्युरोच्या पोलीस निरीक्षक साधना इंगळे, पोलीस हवालदार सचिन गोसावी, पोलीस नाईक नितीन कराड, पोलीस नाईक प्रवीण महाजन, पोलीस नाईक प्रभाकर गवळी आदींच्या पथकाने ही कारवाई केली. पंचवटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यत आला आहे.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…