गट, गणांच्या प्रारूप रचना हरकती, सूचनांवर आज सुनावणी

नाशिक : प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रारूप रचनेवर नोंदविण्यात आलेल्या हरकतींची सुनावणी सोमवारी (दि. 13) विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिकरोड यांच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता होणार आहे
राज्य निवडणूक आयोगामार्फत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका 2022 मध्ये मुदत संपणार्‍या जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची प्रारूप रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासंदर्भात नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसाठी गटांची व पंचायत समिती गणांची प्रारूप रचनेच्या कार्यक्रमाची अधिसूचना 2 जून 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार 2 जून ते 8 जून या कालावधीत सदर प्रारूप रचनेवर हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या.
सदर हरकती व सूचनांवर होणारी सुनवाणी आज सोमवारी (दि.13) होणार असल्याने सुनावणीबाबत झालेल्या या बदलाची हरकतधारकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *