नाशिक

निफाड तालुक्यात संततधार; झाड कोसळले

मका, सोयाबीनसह खरिपातील पिकांना दिलासा

निफाड : विशेष प्रतिनिधी
निफाड तालुक्यात संततधार पावसामुळे सोयाबीन, मका पिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, जनजीवन विस्कळित झाले. बुधवारी दुपारी चारच्या दरम्यान निफाड-उगाव रस्त्यावर झाड पडल्याने काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. मात्र, पडलेले झाड तातडीने दूर केल्यानंतर वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली.
निफाड तालुक्यामध्ये 2 ते 13 ऑगस्टदरम्यान पावसाने दडी मारल्याने सोयाबीन व मका उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. या 12 दिवसांमध्ये कडकडीत ऊन पडत असल्याने सोयाबीन व मका पिकांना विहिरीचे पाणी भरावे लागते की काय, या चिंतेत शेतकरी होते, तर काही शेतकर्‍यांनी आपापल्या सिंचनाच्या साधनाद्वारे पाणी भरण्यास सुरुवात केली होती.
मागील तीन ते चार दिवस तालुक्यात कुठेना कुठे पाऊस कमी-जास्त प्रमाणात हजेरी लावत होता; परंतु सर्वत्र पाऊस झाला नव्हता, मात्र बुधवारी (दि. 20) कोटमगाव, खानगाव, वनसगाव, उगाव या गावांना पावसाने झोडपले. मंगळवारी रात्रीही मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळला. मात्र, बुधवारी सकाळपासून संततधार पावसाने तालुक्यात सुरुवात केली. हा पाऊस जवळजवळ दुपारी चारपर्यंत पडत होता.
पावसाने निफाड, जळगाव, काथरगाव, कोठुरे, गोंडेगाव, चांदोरी, सायखेडा, मांजरगाव, खानगावथडी, नांदूरमध्यमेश्वर, गाजरवाडी, नैताळे, धारणगाव वीर, धारणगाव खडक यांसह परिसरात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळित झाले होते. उद्योग -व्यवसायावर परिणाम झाला होता. हा पाऊस खरीप पिकांना पोषक ठरला आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे.

 

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

15 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago