शनिवार , ३० एप्रिल २०२२.
चैत्र अमावस्या. वसंत ऋतू.
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
चंद्र नक्षत्र – अश्विनी (केतू)(संध्याकाळी ८.१३ पर्यंत) आज दुपारी ३.१९ पर्यंत प्रीती योग आहे, त्यानंतर आयुष्यमा योग आहे.
मेष:- आज तुमच्या राशीत रवी चंद्र युती आहे. विचारपूर्वक निर्णय घ्या. विचार भरकटण्याची शक्यता आहे. क्रोध आवरा.
वृषभ:- भय वाटेल. आरोग्य सांभाळा. मानसिक शांततेची गरज भासेल. विश्रांती घ्या. खर्चात वाढ होईल.
मिथुन:- उत्तम आर्थिक लाभ होतील. मन प्रसन्न राहील. कठोर भूमिका घ्याल. व्यवसायात दबदबा निर्माण होईल.
कर्क:- धाडसी निर्णय नकोत. संमिश्र दिवस आहे. काळजीपूर्वक निर्णय घ्या. वरिष्ठ नाराज होऊ शकतात.
सिंह:-महत्वाची कामे आज नकोत. घरातील जेष्ठ व्यक्तींची काळजी वाटेल. प्रवासात त्रास जाणवेल.
कन्या:- दगदग जाणवेल. मन अशांतराहील. पोटाचे विकार होऊ शकतात. रक्तदाब सांभाळा.
तुळ:- विरोधक पराभूत होतील. नवीन कळप सुचतील मात्र आज त्याची सुरुवात नको. आरोग्य संभाळा.
वृश्चिक:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. अचानक धनलाभ होतील. नवीन संधी चालून येतील. मन मोकळे कराल.
धनु:- संमिश्र दिवस आहे. धाडस अंगाशी येईल. काळजी वाढवणाऱ्या घटना घडू शकतात. मनाला आवरा.
मकर:- वाद विवाद टाळा. इतरांना समजून घ्या. राजकीय क्षेत्रात जपून पावले टाका. जमीन व्यवहारातून हानी होईल.
कुंभ:- सौख्याचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. प्रगतीचा वेग मात्र संथ राहील.
मीन:- इतरांच्या चूका काढू नका. नमते घ्या. विचारपूर्वक निर्णय घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा.
राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
हे ही वाचा :
|
|