ढोल ताशांच्या गजरात एसटी कर्मचारी येतात तेव्हा

लासलगाव प्रतिनिधी

गेल्या पाच सहा महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु होता.राज्य सरकार मध्ये एसटीच्या विलीनीकरण आणि इतर मागण्या घेऊन एसटीचे कर्मचारी संपा वर बसलेले होते.आता एसटी संप संपला असून एसटी कर्मचारी पुन्हा कामावर रुजू होत आहे.यात लासलगाव आगारतील एस् .टी कर्मचाऱ्यांची एकुण २१२ कर्मचाऱ्यांपैकी ५३ बङतर्फ कर्मचारी ढोल ताशाच्या गजरात शुक्रवारी कामावर रुजू झाले.

लासलगाव आगारातील १०० टक्के कर्मचारी हजर झाले असून ढोल ताशांच्या गजरात एस टी ची पूजा करून व नारळ फोडून कामाला सुरुवात करण्यात आली.लासलगाव आगारातील सर्व एस टी कर्मचारी कामावर हजर झाल्यामुळे या भागातील अनेक मार्गावर बस सुरळीत होणार असून बस द्वारे फेऱ्या ही वाढणार होणार आहे.

एस टी कर्मचारी कामावर हजर होत असल्याने लांब पल्ल्यासह ग्रामीण भागातील विस्कळीत झालेली एस.टी.वाहतूक पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे.एसटी आता हळू- हळू पुन्हा आपल्या मार्गावर परतणार असून या मुळे आता प्रवाशांच्या अडचणी संपणार आहे.लासलगाव बस स्थानकात प्रवाश्यांचा संख्येत वाढ होत असल्याने प्रवाशी पहिल्यासारखा एसटीकडे आकर्षित होत असल्याचे चित्र दिसत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *