राशी भविष्य

शनिवार, २९ ऑक्टोबर २०२२.

कार्तिक शुक्ल चतुर्थी/पंचमी, शरद ऋतू, दक्षिणायन

राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०

“आज क्षय दिन, कड पंचमी, पांडव पंचमी आहे.” भद्रा सकाळी ८.१४ पर्यंत. त्यानंतर सकाळी ९.०५ पर्यंत घबाड योग.

नक्षत्र: जेष्ठा

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) दिवसाचा उत्तरार्ध अनुकूल आहे. प्रवास कार्यसाधक होतील. मान सन्मान मिळतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) उत्तम आरोग्य लाभेल. राजकीय क्षेत्रात गौरव होईल. मित्र मंडळी भेटतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) कुटुंबिक सुख लाभेल. प्रेमात यश मिळेल मात्र खर्चात वाढ होईल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दरारा वाढेल. कामात अधिक जबाबदारी अंगावर येईल. आर्थिक नियोजन काटेकोर करा.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) गूढ अनुभव येतील. शिक्षणात यश मिळेल. आर्थिक लाभ होतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) सासुरवाडी कडून लाभ होतील. जमीन व्यवहारातून मात्र मन:स्वास्थ्य बिघडू शकते.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) बौद्धिक क्षेत्रात चमक दाखवाल. यशस्वी मध्यस्थी कराल. सुबत्ता लाभेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) वडिलोपार्जित संपत्तीचा वाद मिटेल. स्थैर्य लाभेल मात्र संततीची चिंता लागून राहील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) प्रगतीसाठी पोषक वातावरण आहे. प्रश्न सुटतील. पूर्व पुण्याई कामास येईल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) सरकारी कामात चालढकल नको. कायदेशीर बाबतीत काळजी घ्या. कुलदेवतेची उपासना करा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) बौद्धिक क्षेत्रात चमक दाखवाल. संवादातून कामे पार पडतील. दानधर्म करा. उपासना लाभदायक ठरेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) कामात चालढकल नको. नवीन करार होण्याचे योग् आहेत. आळस झटकून कामाला लागा.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

33 minutes ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

36 minutes ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

50 minutes ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

54 minutes ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

58 minutes ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 hour ago