शुक्रवार, १३ मे २०२२. वैशाख शुक्ल द्वादशी. वसंत ऋतू. शुभकृत नाम संवत्सर. 

राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००

“आज शुभ दिवस, *प्रदोष* आहे” घबाड संध्याकाळी ५.२८ पर्यंत. आज वज्र योग दुपारी ३.४१ पर्यंत आहे. त्यानंतर सिद्धी योग आहे.

चंद्रनक्षत्र: हस्त (संध्याकाळी ६.४८ पर्यंत)

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. आरोग्य मात्र सांभाळा.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) महत्वाचे करार आज नकोत. कामात अडथळे येऊ शकतात. प्रतिष्ठा पणास लागेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) मानसिक स्वास्थ्य लाभेल. घरात वेळ व्यतीत कराल. अचानक धनलाभ संभवतो.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) लाभदायक दिवस आहे. आर्थिक आवक चांगली राहील. कामे मार्गी लागतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) खर्च वाढवणारा दिवस आहे. कोणताही करार करताना अधिक काळजी घ्या. आर्थिक नियोजन कोलमडेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) चैनीवर खर्च कराल. मन प्रसन्न राहील. मित्र मंडळी भेटतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) काळजी वाढवणारा दिवस आहे. छंद जोपासा. आगीपासून स्वध रहा.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) लाभदायक दिवस आहे. आवडत्या व्यक्ती भेटतील. उष्णतेचा त्रास जाणवेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कामाच्या ठिकाणी वादविवादाचे प्रसंग येतील. जबाबदारी वाढेल. चूक टाळा.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) गैरसमज होऊ देऊ नका. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. अभ्यासात यश मिळेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कामाचे कौतुक होईल. मान सन्मान मिळतील. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) भावना व्यक्त करा. मन मोकळे करा. जीवनाचा आनंद घ्या. विवाह इच्छुकांना खुशखबर मिळेल.

 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी 

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

मोहाडीत मोहाडमल्ल महाराजांची शतकाची रोठ परंपरा

लोकसहभागातून साडेतीन लाखांचा रथ; आज भव्य मिरवणूक दिंडोरी : प्रतिनिधी तालुक्यातील मोहाडी येथील ग्रामदैवत श्री…

18 hours ago

सिंहस्थाच्या नावाने त्र्यंबकेश्वरचे रस्ते गाळात

ओव्हर स्मार्ट नियोजनामुळे नागरिक अन् भाविक हैराण त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर…

18 hours ago

पावसा पावसा… तू पण!

नाशिक शहर आणि सभोवतालच्या परिसरात मागील महिन्याभरात धो..धो.. पाऊस बरसला आहे. नाशिक जिल्ह्यात जुलै महिन्यात…

18 hours ago

अब्दुल्लांचे आंदोलन

कॉक्रोच जनता पार्टीच्या ‘चलो संसद’ आंदोलनात 20 जुलै रोजी प्रचंड हंगामा झाला. विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी…

18 hours ago

जीवघेणे खड्डे !

पाच जणांचा मृत्यू; नागरिकांमध्ये प्रचंड संताप नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर शहरात हजारो कोटी…

18 hours ago

खड्डेमुक्तीसाठी मंत्री महाजनांचा सात दिवसांचा अल्टिमेटम

अन्यथा अधिकार्‍यांवर कारवाई, ठेकेदारही रडारवर नाशिक : प्रतिनिधी वर्षभरात सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने शहरात रस्ते…

18 hours ago