राशिभविष्य

शनिवार, ७ मे २०२२. वैशाख शुक्ल शष्टी. वसंत ऋतू. 

राहुकाळ – सकाळी ९.० ते सकाळी १०.३०

“आज चांगला दिवस आहे” घबाड दुपारी १२.१८ पर्यंत
चंद्र नक्षत्र – पुनर्वसू. आज शूल योग संध्याकाळी ७.५८ पर्यंत आहे, त्यानंतर गंड योग आहे.

मेष:- अतिशय चांगला दिवस आहे. प्रगतीचा वेग वाढत आहे. आनंदाचा काळ आहे. अधिकार वाढतील.

वृषभ:- अप्रतिम कालखंड आहे. संधीचे सोने करा. आर्थिक भरभराट होईल. वेळ दवडू नका.

मिथुन:- तुमच्या बोलक्या स्वभावाचा लाभ होईल. विक्री क्षेत्रात तुफान यश मिळेल. व्यवसाय वाढेल.

कर्क:- नात्यातून आनंददायी अनुभव येतील. मेजवानी मिळेल. अधिकार गाजवाल. खुश रहाल.

सिंह:- योग्य कारणासाठी खर्च होईल. प्रिय व्यक्तींना वेळ द्याल. मौल्यवान खरेदी होईल. महत्वाची कामे आज पूर्ण करा.

कन्या:- उत्तम दिवस आहे. अडलेली कामे मार्गी लागतील. अडचणी दूर होतील. प्रवास कार्यसाधक होतील.

तुळ:- कामाच्या ठिकाणी आनंददायी वातावरण राहील वरिष्ठ खुश होतील. जबाबदारी आनंदाने पार पडाल.

वृश्चिक:- प्रगती होईल उच्च शिक्षणात यश मिळेल. दूरचे प्रवास संभवतात. वक्तृत्व गाजेल.

धनु:- काळजी घेण्याचा दिवस आहे. गुंतवणूक मधून उत्तम लाभ होतील. नातेवाईक मदत करतील. कामाचा ताण वाढेल.

मकर:- शुभ काळ आहे. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. व्यवसायात आणि राजकारणात दमदार पावले टाकाल.

कुंभ:- बुद्धिमत्ता विलक्षण चमकेल. चतुराई कामास येईल. प्रगतीची घोडदौड सुरू होईल. क्रोध आवरा.

मीन:- आर्थिक लाभ होतील. लक्ष्मी माता प्रसन्न होईल. समजून उमजून काम केल्यास भरपूर यश मिळेल.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *