नाशिक

शासकीय जमिनीवरील घरे होणार अधिकृत

निफाड उपविभागीय अधिकार्‍यांचे नगरपालिकांना आदेश

सिन्नर : प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, ओझर, सिन्नर आणि निफाड शहरांमध्ये शासकीय जमिनीवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. 1 जानेवारी 2011 पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, त्याची अंमलबजावणी तातडीने सुरू करण्याचे आदेश निफाड उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी संबंधित नगरपालिकांना दिले आहेत.
महसूल व वन विभागाच्या 25 मार्च 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार, 2011 पूर्वीपासून शासकीय जमिनीवर घरे बांधून राहणार्‍या नागरिकांना मालकी हक्क मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत पात्र लाभार्थ्यांचे अर्ज तातडीने स्वीकारण्याचे आणि प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
नगरपालिका हद्दीतील पात्र नागरिकांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह संबंधित नगरपालिका कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
अर्जांची छाननी करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली असून, पात्रतेचा अंतिम निर्णय ही समिती घेणार आहे.
या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विधानसभा क्षेत्रस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे.
स्थानिक आमदारांकडून या प्रक्रियेचा नियमित आढावा घेतला जाणार असल्याने प्रशासनाला कामकाजात गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून घरांच्या मालकी हक्काच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, स्थानिक पातळीवर या निर्णयाचे स्वागत
होत आहे.

नियमानुकूलतेसाठी महत्त्वाच्या अटी

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. अतिक्रमण
1 जानेवारी 2011 पूर्वीचे असणे आवश्यक आहे. संबंधित जमीन शासकीय स्वरूपाची असावी; ती संरक्षित, आरक्षित किंवा वनजमिनीत समाविष्ट नसावी. अतिक्रमणाचा वापर केवळ निवासासाठीच असावा, व्यावसायिक वापरासाठी नसावा. 2011 पूर्वीच्या वास्तव्यासंदर्भात रेशनकार्ड, वीजबिल किंवा मतदार यादीतील नाव यांसारखे पुरावे सादर करणे बंधनकारक आहे. तसेच अर्जदाराकडे त्याच ठिकाणी अन्य मालमत्ता नसावी.

 

 

 

Houses on government land will be official

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

15 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

15 hours ago