Categories: नाशिक

आदिवासी भागातील डोंगरदर्‍यांत बहरताहेत करवंदे

इगतपुरी तालुक्यात आदिवासी बांधवांना मिळतोय रोजगार

इगतपुरी : प्रतिनिधी
तालुक्यातील डोंगरदर्‍या परिसरातील आदिवासी भागातील “डोंगरची काळी मैना” म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी परिसरात डोंगरदर्‍यांत बहरू लागली आहे. आता रानमेवाही तयार होऊ लागल्याने आगामी महिन्याभरातच या भागात रानमेव्याचा आस्वाद घेता येणार आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांसाठी हक्काचा रोजगार उपलब्ध होणार आहे.
कसारा घाट, त्रिंगलवाडी, आवळखेड, धारगाव, भावली, बोर्ली, जांमुढे, गव्हाडे, खैरगाव या परिसरात आंबटगोड करवंदांचे काटेरी जाळ्या पसरलेल्या असतात. पांढर्‍या
फुलांची गळती झाल्यावर हिरव्या रंगांचे करवंदांचे घड बहरतात. पिकल्यावर त्यांचा रंग काळा होतो. आदिवासी बांधव पहाटे लवकर करवंदे तोडण्यासाठी रानात पायपीट करत असतात. विलायती चिंच, आवळं, आंभळे, तोरणं, कैरी आदींची चवही काही न्यारीच आहे. करवंद हे बेरीवर्गीय फळ असून, त्याचा आरोग्य राखण्यासाठीही उपयोग होतो. यामधील अनेक घटक रोगप्रतिकारशक्तीचे काम करतात. करवंद हे नाशवंत फळ असल्याने जास्त काळ टिकत नाही, मात्र कच्च्या करवंदाचे लोणचे व पिकलेल्या करवंदांचा मुरब्बा केला तर जास्त काळ टिकतो.
आदिवासी भागातील करवंदे मुंबई, पुणे, नगर, संगमनेर, शिर्डी, नाशिकपर्यंत पोहोचतात, मात्र हक्काची बाजारपेठ नसल्याने व्यापारी वाटेल त्या भावात करवंदे खरेदी करून विक्री करतात. तर लहान बालके व वृद्ध महिला पळसाच्या पानाचे ड्रोन भरून दिवसभर रस्त्याच्या कडेला बसून करवंदांची विक्री करतात. तर काही महिला इगतपुरी रेल्वे स्थानकावरसुद्धा विक्री करतात.

करवंदांमुळे रोजगार उपलब्ध होत असल्याने इगतपुरीच्या अतिदुर्गम भागातील डोंगरदर्‍या परिसरात करवंदांची शेती करणे गरजेचे आहे. यासाठी वन विभागाने सहकार्य करणे गरजेचे आहे. करवंद या झाडाचे संवर्धन होण्याबरोबर आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल.
– लहानू भले, ग्रामस्थ

करवंदांच्या झाडांना काटे

डोंगरची काळी मैना म्हणून ओळखल्या जाणार्‍या करवंदांचा गोडवा वाढत्या तापमानात मिळतो. या झाडाला काटे असतात. अशा गर्मीत मनाला गारवा देणारी करवंदं खायची संधी मिळते. डोगररांगेत मोठ्या प्रमाणात करवंदांच्या जाळ्या पाहायला मिळतात. थंडगार असलेली करवंदं खायला मस्त असून, ती खाल्ल्यानंतर मनाला गारवा मिळतो.

संवर्धन होणे गरजेचे

आदिवासी भागातील कष्टपूर्वक काढलेल्या करवंदांना कमी भाव बाजारात मिळतो. शहरात व ग्रामीण भागात उन्हाळी रानमेव्याव्यतिरिक्त करवंदांची चव काही औरच असते, परंतु करवंद या रानमेव्याच्या झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने याही झाडांचे संवर्धन होणे गरजेचे आहे.

Karvande trees are blooming in the mountain rivers of tribal areas.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

15 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

16 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago