केटरिंग व्यावसायिकांच्या अडचणी
♦ ऑर्डर अनेकदा दोन दिवस किंवा एक दिवस आधी मिळते. सात दिवस आधी माहिती देणे कठीण.
♦ सात दिवस आधी दिलेला मेन्यू ऐनवेळी बदलण्याची मागणी ग्राहकांकडून होते.
पाहुण्यांची संख्या वाढल्यास अतिरिक्त कर्मचारी ऐनवेळी घ्यावे लागतात.
♦ कायमस्वरूपी कर्मचार्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र शक्य, मात्र तात्पुरत्या कर्मचार्यांचे प्रमाणपत्र तातडीने कसे मिळवायचे?
♦ धान्य, डाळी, तेल, तूप, मसाले आदींची पक्की बिले व खरेदीचा स्रोत जतन करण्याची अतिरिक्त जबाबदारी.
नाशिक : प्रतिनिधी
लग्नसमारंभ, महाप्रसाद, भंडारा, लंगर, इफ्तार पार्टी, अन्नछत्र तसेच विविध सार्वजनिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये सामूहिक भोजनाचे आयोजन करताना अन्नसुरक्षेची काळजी घेण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार सामूहिक भोजनाच्या कार्यक्रमाची माहिती किमान सात दिवस आधी प्रशासनाला द्यावी लागणार आहे. संबंधित केटरिंग व्यावसायिक, भोजनाचा मेन्यू, कच्च्या मालाचा स्रोत, स्वयंपाकाची जागा, पाणी, स्वच्छता आदींची माहिती प्रशासनाला उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. अन्नसुरक्षेच्या दृष्टीने नियम योग्य असले, तरी त्यातील काही अटींची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे कठीण असल्याने छोट्या केटरिंग व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे.
सात दिवस आधी भोजनाची माहिती देण्याची अट केटरिंग व्यावसायिकांसाठी सर्वाधिक अडचणीची ठरत आहे. प्रत्यक्षात ग्राहकांकडून लग्नसमारंभ किंवा अन्य कार्यक्रमांची ऑर्डर अनेकदा दोन दिवस आधी, तर काही वेळा एक दिवस आधीच दिली जाते. त्यामुळे अशा ऑर्डरची सात दिवस आधी प्रशासनाला माहिती देणे शक्य नसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. मोठ्या कार्यक्रमांची तारीख आधी निश्चित असली तरी भोजनाची अंतिम ऑर्डर, पाहुण्यांची संख्या आणि मेन्यू अनेकदा शेवटच्या काही दिवसांत ठरतो. याशिवाय, सात दिवस आधी मेन्यूची माहिती प्रशासनाला दिल्यानंतर ग्राहकांकडून ऐनवेळी त्यात बदल करण्याची मागणी केली जाते. स्वयंपाकी, भोजन वाढणारे आणि अन्न हाताळणार्या प्रत्येक कर्मचार्याकडे वार्षिक वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. कायमस्वरूपी कर्मचार्यांच्या बाबतीत ही प्रक्रिया करणे शक्य असले तरी मोठी ऑर्डर मिळाल्यानंतर ऐनवेळी अतिरिक्त स्वयंपाकी, वाढपी किंवा अन्य कर्मचारी घ्यावे लागतात. काही कर्मचारी केवळ एका कार्यक्रमासाठी किंवा काही दिवसांसाठी घेतले जातात. अशा वेळी नव्याने येणार्या कर्मचार्यांची तत्काळ वैद्यकीय तपासणी करून तंदुरुस्ती प्रमाणपत्र कसे उपलब्ध करणार, असा सवाल व्यावसायिकांकडून उपस्थित केला जात आहे.
कर्मचार्यांची वैद्यकीय तपासणी हा नवीन नियम नसून, पूर्वीपासूनच असलेली आणि आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक प्रक्रिया आहे. 25 सप्टेंबरनंतर नाशिकमधील प्रमुख पदाधिकारी, केटरिंग असोसिएशनचे प्रतिनिधी आणि संबंधित अधिकार्यांची बैठक होणार आहे. नियमांमुळे वधू-वर पक्षाला किंवा आयोजकांना कोणताही मनस्ताप होणार नाही.
– उत्तमराव गाढवे,
अध्यक्ष, महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनअन्न व औषध प्रशासनाची नियमावली स्वागतार्ह आहे. हायजेनिकदृष्ट्या त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. प्रशासनाला आमचे सहकार्य असतेच. पुढेही आमची सहकार्याची भूमिका राहील.
– मंदार तगारे,
खजिनदार, जिल्हा केटरिंग असोसिएशन
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…